शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

छत्रपती संभाजीनगरात बिबट आला कसा आणि गेला कुठे? शोध सुरू, दोन ठिकाणी लावले पिंजरे

By साहेबराव हिवराळे | Updated: July 17, 2024 12:30 IST

अंदाज व आखणी सुरू, जुन्नर येथून विशेष पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल

छत्रपती संभाजीनगर : उल्कानगरी परिसरात सोमवारी पहाटे फिरताना बिबट सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानुसार वन विभागाने पथक तैनात केले. परिसराला वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वेढा घातला आहे. झाडेझुडपांच्या ठिकाणी आणि शंभूनगरात पोद्दार शाळेच्या मागे पिंजरा ठेवून त्याच्यासाठी आमिष म्हणून दोन बकरे ठेवण्यात आले आहेत.

वन विभागातील सर्व तालुक्यांतील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, कर्मचाऱ्यांनी लोखंडी पिंजरे लावून बिबट्यासाठी जणू जाळे पसरविले आहे. परिसरात या पथकाला बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले नसले, तरी सीसीटीव्हीवरील त्याच्या हालचाली अशा दिसत आहेत की, तो कित्येक दिवसांपासून नाल्याच्या कडेला झाडाझुडपांत वास्तव्यास असावा.

सातारा-देवळाई डोंगरातून आला ?सातारा-देवळाई डोंगरातून बिबट्या आला असावा, असाही अंदाज अधिकाऱ्यातून व्यक्त होतोय. मोकाट कुत्रे येथे मोठ्या प्रमाणात असून, सध्या कुत्र्यांची संख्यादेखील कमी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले, कारण ते बिबटचे आवडते खाद्य असते. उल्कानगरी ते शंभूनगरापर्यंत तो दिसल्याच्या व्हिडीओ क्लिपिंग व्हायरल होत आहेत. १२ तारखेपासून त्याचे येणे-जाणे सीसीटीव्हीत कैद झाले. मंगळवारी मात्र तो दिवसभर दिसला नाही. जुन्नर येथून आलेल्या रेस्क्यू टीमचे डॉ. अविनाश मिसलकर व त्यांचे ११ सहकारी तयारीसह दाखल झाले. बिबट शहराबाहेर कसा जाऊ शकतो, अशा चर्चेस दिवसभर उधाण आले होते. परिसरातील मोकाट कुत्रे आणि काही डुको त्याला विनासायास शिकारीस मिळत असल्याने अद्याप कुणालाही त्याचा त्रास झाला नाही, परंतु लहान मुले घराबाहेर जाताना पालकांत चिंता वाटत आहे.

बिबट्या नर की मादी?शहरातील गजबजलेल्या परिसरात हा बिबट्या आलाच कसा, असा प्रश्न आहे. ज्यांच्या घरात सीसीटीव्ही आहे ते रेकाॅर्डिंग शोधत आहेत. त्यानुसार वनअधिकारीही कामाला लागले आहेत. हे जनावर नर आहे की मादी, त्यावरून रेस्क्यू टीम त्याला पकडण्याची योजना आखत आहे.-डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य

गस्त सुरूकचरा संकलनाच्या गाड्या व लगत नाला आणि घनदाट झाडी आहे. तेथे दक्षता घेत पिंजरे लावले आहेत. पथकाची गस्त सुरू आहे.-दादा तौर, वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforestजंगल