शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘वसुली नसल्यास विकास कसा करणार’; औरंगाबाद मनपात नगरसेवकांचा प्रशासना विरोधात संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:41 IST

जानेवारी महिना संपत आला तरी मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली अत्यंत नगण्य आहे. मार्चअखेरपर्यंत हीच अवस्था असल्यास शहरातील विकासकामे कशी करणार, असा संतप्त सवाल बुधवारी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला.

औरंगाबाद : जानेवारी महिना संपत आला तरी मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली अत्यंत नगण्य आहे. मार्चअखेरपर्यंत हीच अवस्था असल्यास शहरातील विकासकामे कशी करणार, असा संतप्त सवाल बुधवारी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. ढीम्म प्रशासनाने नेहमीप्रमाणे वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. सभापती गजानन बारवाल यांनी वसुली वाढविण्याचे निर्देश दिले.

बुधवारी स्थायी समितीची बैठक सुरू होताच माजी खा. प्रदीप जैस्वाल यांच्या पत्नी सरोज जैस्वाल, स.भु.चे दिनकर बोरीकर यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. खा. चंद्रकांत खैरे यांची सेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. यानंतर नगरसेवकांनी आपला मोर्चा मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीकडे वळविला. नगरसेवक सीताराम सुरेयांनी नमूद केले की, झोन ४ मध्ये नागरिक स्वत:हून पाणीपट्टी भरण्यास जात आहेत. तेथील कर्मचारी तुमचे रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध नाही, एवढे कारण सांगून नागरिकांना परत पाठवत आहेत. ही कोणती पद्धत मनपाने काढली, असे सांगून आपला रोष व्यक्त केला. त्यासोबतच राज वानखेडे, राजू वैद्य, सिद्धांत शिरसाट यांनी वसुलीच्या मुद्यावर प्रशासनावर तोफ डागण्यास सुरुवात केली. उपायुक्त वसंत निकम यांनी खुलासा केला की, यंदा ३९० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ५७ कोटी रुपये वसूल झाले होते. त्या तुलनेत यंदा आपण ९ कोटींनी मागे आहोत. एका कर्मचार्‍याला फक्त ८० मालमत्तांचे उद्दिष्ट देऊन कामाला लावा. ३ हजार कर्मचारी आहेत. वसुलीसाठी सूक्ष्म नियोजन करावे, असा सल्ला नगरसेवकांनी दिला.

१४० कर्मचार्‍यांची नवीन फौजवॉर्ड अधिकारी पूर्वी वसुलीसाठी कर्मचारीच नाहीत, अशी ओरड करीत होते. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला १४ ते १५ कंत्राटी कर्मचारी देण्यात आल्याचे उपायुक्त वसंत निकम यांनी नमूद केले. सुलीकडे लक्ष देण्यासाठी आयुक्तांनी दोन विशेष अधिकार्‍यांचीही निवड केल्याचे त्यांनी सांगितले. मालमत्ता आणि पाणीपट्टी एकाच वेळी वसूल करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी सभापती बारवाल यांनी वसुलीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादTaxकर