शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाचा गाडा एकटीने हाकायचा कसा...?

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

ना मिळाली शासकीय मदत, ना कोणाचा आधार. जीवन तर जगावेच लागतेय. कर्जबाजारी झाल्याने पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली

ना मिळाली शासकीय मदत, ना कोणाचा आधार. जीवन तर जगावेच लागतेय. कर्जबाजारी झाल्याने पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आता वयोवृद्ध सासु-सासरे, स्वत:च्या दोन मुली, एक मुलगा, यांची जबाबदारी पेलायची कशी? या विवंचनेत उषा दत्ता राऊत हिचा नियतीशी संघर्ष सुरू आहे.ही व्यथा आहे अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची. सलग तीन वर्षांपासून दुष्काळ सदृश्य स्थितीचा सामना करताना झालेली दमछाक. शेतीसाठी घेतलेल्या बँकांच्या कर्जाचे हप्ते वाढू लागले. झालेल्या उत्पन्नातून खर्चही निघेना. दिवसेंदिवस कर्ज वाढूच लागले. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? यातून नैराश्य आल्याने पूस येथील दत्ता प्रभू राऊत (वय - ३६) या शेतकऱ्याने २२ नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दत्ता प्रभू राऊत हा अल्पभूधारक शेतकरी आपल्या दोन एक्कर शेतीवर तो संपूर्ण कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होता. शेती करताना त्याने आई-वडिलांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या उत्पन्नातून खर्चही निघेना म्हणून तो गावातच शेतमजूर म्हणून काम करू लागला. परंतु आर्थिक जुळवाजुळवीचे गणीत काही जमेना. कर्जाचे हप्ते वाढू लागले. यातूनच नैराश्य आल्याने त्याने घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दत्ता राऊत याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, उषा, दोन मुली, एक मुलगा असा संसार आता उघडयावर पडला आहे. दत्ता प्रभू राऊत या शेतकऱ्याची आत्महत्या झाली या घटनेचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात कृषि विभाग, शेतकऱ्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट, या सर्व बाबींचा अहवाल पाठविला आहे. या घटनेबाबत आपला पाठपुरावा सुरू असल्याचे तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले.शासनाला गांभीर्य नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे व समस्यांकडे कायम दुर्लक्ष राहिले आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविल्या जातात. त्या खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना मिळत नाहीत. या संदर्भात सातत्याने अशा दुर्घटना घडूनही शासनाला गांभीर्य नाही. अशी प्रतिक्रिया कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. पंकजा मुंडेंचा मतदारसंघपंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या परळी या मतदारसंघात पूस हे गाव आहे. ही दुर्घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली. घटना घडल्यानंतर पंकजा यांच्या मतदारसंघात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मात्र, अद्यापही पंकजा अथवा खा. प्रितम यांनी या कुटुंबियांची भेट घेण्याचे साधे औदार्यही दाखविले नाही. याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकण्यास मिळाली.