शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुले कशी आहेत, व्हिडिओ काॅल लावा; अपघातात असह्य वेदनेतही आईला मुलाबाळांची चिंता

By संतोष हिरेमठ | Updated: October 16, 2023 14:21 IST

हा प्रवास जीवावर उठेल, असे वाटले नव्हते

छत्रपती संभाजीनगर : एका ठिकाणी जेवण करून गाडीत बसलो आणि काही मिनिटांतच झोप लागली. पण, अचानक काय घडले कळलेच नाही आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा रुग्णालयात होतो. हा प्रवास जीवावर उठेल, असे वाटले नव्हते, अशा शब्दांत समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात जखमींनी आपली भावना व्यक्त केली. ‘मुले कशी आहेत, व्हिडिओ काॅल लावा...’ अशी विनंतीही जखमी नातेवाइकांकडे करीत होते.

पती गाडी चालवीत होतेएका ठिकाणी जेवणासाठी थांबलो होतो. जेवणानंतर गाडीत बसलो. पती संदीप अस्वले (टेम्पो ट्रॅव्हलर) हे गाडी चालवीत होते. मी पाठीमागे बसले होते. अचानक पाठीमागून कोणीतरी जोरदार धडक दिल्याचे जाणवले. त्यानंतर रुग्णालयातच जाग आली. माझ्या डोक्याला खूप मारला लागला आहे.-पूजा अस्वले, जखमी

काही आठवेनानेमके काय झाले, हे काही कळलेच नाही. काही आठवतच नाही, असे संदीप अस्वले म्हणाले. अपघाताचा त्याचा मोठा धक्का बसला. त्यांच्या डोक्याला, नाकाला दुखापत झाली आहे.- संदीप अस्वले

नशिबाचा भागपरतीचा प्रवास सुरू असताना अचानक अपघात झाला. हा सगळा नशिबाचा भाग आहे. सोबत पत्नी, मुलेही होते.- लखन साळवे, जखमी

झोपेत काही कळेलच नाहीझोपेत होतो. नेमके काय झाले, कसे झाले, हे काही कळलेच नाही. अपघातात मोबाईल कुठेतरी पडला. त्यामुळे घाटीत दाखल झाल्यानंतर कुटुंबीयांशी संपर्कही साधता आला नाही.-अनिल साबळे, जखमी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात