शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी सुरू झाली शिरखुर्म्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 19:00 IST

रमजान ईदचा खास मेनू म्हणजे ‘शिरखुर्मा’

औरंगाबाद : रमजान ईद सणाची गोडी वाढते ती शिरखुर्म्यामुळे. ईदला अजून आठवडा बाकी असला तरी घरोघरी शिरखुर्म्याची तयारी सुरू झाली असून, शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. बहुतांश महिलांनी या वस्तू खरेदीही केल्या आहेत. 

रमजान ईदचा खास मेनू म्हणजे ‘शिरखुर्मा’. ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम कुटुंबाच्या घरी बनणारा हा पदार्थ. याबाबत माहिती देताना एकतानगरमधील सादिया खान म्हणाल्या की, कुटुंब किती मोठे, ईदच्या दिवशी किती पाहुणे घरी येणार आहेत आणि किती जणांच्या घरी शिरखुर्मा पाठवायचा आहे, यावरून शिरखुर्म्यासाठी किती सामान आणायचे, हे ठरवले जाते. काही घरांमध्ये तर १० ते १५ लिटर दुधाचा शिरखुर्मा बनविला जातो. बदाम, काजू, खोबरे, किसमिस, पिस्ता, अक्र ोड, शेवया, खजूर, अंजीर, जर्दाळू, चारोळी असा सुकामेवा शिरखुर्म्यासाठी वापरण्यात येतो. अनेक घरांत आता या गोष्टींची खरेदी झाली असून, खोबरे किसून ठेवणे, बदाम सोडून इतर सुकामेव्याचे तुकडे करून ठेवणे, खजुरातून बिया काढून ठेवणे हे काम सुरू आहे. ईदच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर शिरखुर्मा बनवावा लागत असल्यामुळे या गोष्टींची तयारी आठवडाभर आधीपासूनच सुरू होते. 

ईदच्या आदल्या दिवशी रात्री बदाम पाण्यात भिजवत टाकतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचे साल काढून बारीक तुकडे के ले जातात आणि हे तुकडे मग शिरखुर्म्यात टाकले जातात. काहीजण हे पदार्थ आधीच तळून ठेवतात. त्यामुळे ईदच्या आदल्या दिवशी किंवा ईदच्या दिवशी महिलांची गडबड होत नाही. 

असा बनवा शिरखुर्माशिरखुर्मा नेमका तयार होतो कसा, याची उत्सुकता अनेक महिलांमध्ये दिसून येते. या सगळ्यांसाठी शिरखुर्मा बनविण्याची कृती सांगताना सादिया खान म्हणाल्या की, सगळ्यात आधी रात्री बदाम पाण्यात भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी थोड्या तुपात शेवया टाकून त्या लालसर होईपर्यंत भाजायच्या. यानंतर सर्व सुकामेवा तुपात परतायचा. यानंतर यात आटवलेले व साखर घातलेले दूध टाकायचे. अंजीर, जर्दाळू, खजूर या गोष्टी नंतर टाकाव्यात. त्यानंतर वरून बदामाचे काप टाकून शिरखुर्मा सजवायचा.

ईदला शिरखुर्माच का?ईदला शिरखुर्माच का बनविला जातो, याविषयी सांगताना मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की, मूळ शिरखुर्मा म्हणजे दूध आणि खजूर यांचेच मिश्रण होय. पूर्वी खजूर हे सौदी अरेबियाचे मुख्य पीक होते, त्यामुळे ते तेथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे सगळ्यांना सहज घेणे शक्य व्हायचे. त्यामुळे दूध म्हणजे शिर आणि खुर्मा म्हणजे खजूर या दोन्हींच्या मिश्रणातून शिरखुर्मा तयार झाला. काळानुसार आवड आणि बदलत जाणाऱ्या खाद्यसंस्कृतीमुळे यात अनेक बदल होत गेले आणि यामध्ये शेवया व इतर सुकामेवाही येत गेला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक