शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलन करणाऱ्या कंपनीची मनपाला हूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:22 IST

शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.

ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी उद्घाटन : दुसºया दिवशी कामच सुरू केले नाही

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. डोअर टू डोअर कलेक्शन करण्याची जबाबदारी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनीला दिली आहे. कंपनीने शहरातील १ मेट्रिक टन कचरा जमा केल्यास मनपा कंपनीला १८६३ रुपये देणार आहे. तीन महिन्यांपूर्वी मनपाने कंपनीला वर्क आॅर्डर दिली आहे. निविदेतील अटी-शर्थीनुसार कंपनीने स्वत:च्या मालकीची नवीन वाहने आणावीत. साधारणपणे ३०० रिक्षा, मोठी वाहने किमान १०० असावीत, असे नमूद केले आहे. कंपनीने आतापर्यंत ५० टक्केच वाहने आणली आहेत. वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, मनपाने जागा द्यावी, अशी मागणी कंपनीने केली आहे. कंपनीने त्वरित काम सुरू करावे, अशी मनपाची इच्छा आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी काम सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत तीन तारखा कंपनीला दिल्या. एकाही तारखेला कंपनीने काम सुरू केलेले नाही. प्रजासत्ताकदिनी बळजबरी महापालिकेने कंपनीच्या वाहनांचे पूजन करून कामाचा शुभारंभ झाला असे जाहीर केले. २७ जानेवारी रोजी कंपनी काम सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी कंपनीने शहरातील एक किलो कचराही उचलला नाही.९०० कर्मचाºयांची गरजशहरातील ११५ वॉर्डांमधील प्रत्येक घरातून कचरा जमा करण्यासाठी कंपनीला किमान ९०० कर्मचारी लागणार आहेत. कंपनीकडे आतापर्यंत ४०० ते ४५० कर्मचारी आहेत. उर्वरित मनुष्यबळ कंपनीला मिळालेच नाही. कचरा उचलणारे कामगार सहजासहजी मिळायला तयार नाहीत.कंपनीवर दबावसिडको-हडकोमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून अस्थायी कामगार काम करीत आहेत. या कामगारांची संख्या जवळपास ४०० आहे. बचत गटामार्फत अनेक कर्मचारी नेमले आहेत. हे सर्व कर्मचारी कंपनीने कोणत्याही अटीशिवाय घ्यावेत म्हणून कंपनीवर दबाव टाकण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न