शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हर्सूल यात्रेत नृत्याची ‘हॉर्स पॉवर’; गण्या, सोन्या, शंभूवर प्रेक्षक फिदा 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 11, 2022 13:22 IST

घोड्यांचे बाज, टेबलावर चढून आकर्षक नृत्य

औरंगाबाद : तुम्ही घोड्यांची शर्यत पाहिली असेल... वायुगतीने धावत शर्यत जिंकणारे घोडे पाहिले असतील... मात्र, गुरुवारी हलगीच्या तालावर तेही चक्क बाजेवर, टेबलावर चढून चारी पाय हवेत उधळत बहरदार नृत्य करणारे घोडे हर्सूलकरांना पाहण्यास मिळाले. नाशिकहून आलेले गण्या, सोन्या व पैठणचा शंभू यांची ऐटीत चाल, दोन्ही पायावर उभे राहत चौफेर दिलेली सलामी.. डान्सचा ‘हॉर्स पॉवर’ने जमलेले गावकरी जाम खूश झाले.

निमित्त होते हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाचे. तिसऱ्या दिवशी दुपारी ‘घोड्यांची नृत्य स्पर्धा’ ठेवण्यात आली होती.यासाठी खास तयार करण्यात आलेल्या गोलकार मैदानाच्या चोहीबाजूला आबालवृद्ध सकाळी १० वाजल्यापासून बसून होते. दुपारी साडेबारा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. इरफान पटेल यांचा काजल नावाचा घोडा मैदानात आला. चारी पाय मुडपत खाली बसून परीक्षकांसमोर नतमस्तक झाला. त्यानंतर पाठीमागील दोन पायावर उभे राहत संपूर्ण मैदानावर चालत सर्वांना सलामी दिली. नाशिक येथील घनराज घोटे यांचा ‘गण्या’ नावाचा पांढरा शुभ्र घोडा मैदानात आला आणि आपल्या रूबाबदार चालीने सर्वांच्या टाळ्या मिळविल्या. हलगीचा तालावर त्याने नृत्य करण्यास सुरुवात केली. परातीत उभे राहून नृत्य, लाकडी पाटावर उभे राहून नृत्य एवढेच नव्हे, तर बाजेवर बाज ठेवून नृत्य केले. या गण्याने बाजेवर ठेवलेल्या गादी व लोढावर रूबाबात बसून दाखविले. त्याचीही या अदावर सर्वजण फिदा झाले होते. त्यानंतर चारीही पाय हवेत उधळत नाशिक घोटी येथील ‘सोन्या’ हा घोड्याने जोरदार एन्ट्री केली. मैदानात झोपलेल्या चार तरुणांना धक्का न लावता त्यांच्या आजूबाजूला नृत्य करत त्याने आपले संतुलन दाखवून दिले.

पैठण येथील भाऊराव रावस यांचा ‘शंभू’ घोड्याने तर कमाल केली. चारी पाय हवेत उधळतच नृत्य करण्यास सुरुवात केली. हलगीवाला वाजवून थकला पण हा घोडा नाचून दमला नव्हता... मालकाच्या इशाऱ्यावर मिनिटा-मिनिटाला आपली चाल बदलत नृत्य करत सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. हर्सूलचा ‘कल्याण’, ‘ हिरा’ या घोड्यांनीही नृत्य करत सर्वांच्या टाळ्या मिळविल्या. ही स्पर्धा दोन तास चालू होती. मुक्या जनावरांकडून नाचकाम करून घेणे हे सोपे नव्हे. त्यामुळेच आजच्या स्पर्धेत घोड्यांच्या मालकांचाही सत्कार करण्यात आला. कारण, त्यांनी घोड्यावर घेतलेली मेहनत दिसून येत होती. घोड्याचे नृत्य पाहताना दोन तास कुठे निघून गेले हे गावकऱ्यांना कळाले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक