शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरजवळ चारचाकीने दुचाकीला पाठीमागून उडवले, तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:07 IST

चिकलठाणा पोलिसांनी कारमधील पाचजणांना ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गांधेली परिसरातील हॉटेल पल्लवीसमोरील कटपॉइंटसमोर धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला (एमएच २० एचजी ०१४२) पाठीमागून वेगात येणाऱ्या चारचाकी कारने (एमएच २० जीव्ही ९६६४) उडवले. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. मंगळवारी (दि. ६) रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाल्याचे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितले.

मृतांमध्ये शेख रफिक शेख गफूर (५०, रा. सईदा कॉलनी, जटवाडा), शेख मोईन शेख हरलाल (रा. जिन्सी) आणि शेख आदिब शेख अनवर (रा. शहाबाजार) यांचा समावेश आहे. मृत तिघेही गांधेली परिसरात कामानिमित्त गेले होते. तेथून शहराकडे दुचाकीवर येत असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने दुचाकीला उडवले. वेग जास्त असल्यामुळे दुचाकीवरील तिघे दूरवर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे जागीच गतप्राण झाले.

माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तिघांना ॲम्ब्युलन्समधून घाटी रुग्णालयात पाठविले. चिकलठाणा पोलिसांनी कारमधील पाचजणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पाचजण पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घटनास्थळाला पोलिस उपअधीक्षक पूजा नागरे, पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे, पोलिस उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देत पंचनामा केला.

घटनास्थळी रक्ताचा सडाचारचाकीने दुचाकीला जोरात धडक दिल्यानंतर दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर जोरात आपटले. त्यात त्यांचे डोके फुटले. त्यामुळे घटनास्थळावर रक्ताचा सडा पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

चारचाकीतील काही जखमीचारचाकी गाडीचेही समोरील बाजूने मोठे नुकसान झाले. त्यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मिनी घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहितीही चिकलठाणा पोलिसांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर