शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

बीड बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने दुचाकीस्वार भावंडांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:24 IST

A horrific accident on Beed bypass : संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून केबीनच्या काचा फोडल्या.

ठळक मुद्देजमाव ट्रक पेटविण्याच्या तयारीत असतांना पोलीस घटनास्थळी पोहचलेअपघातात मृत दोन्ही तरुण आते- मामेभाऊ आहेत.

औरंगाबाद: कामावर निघालेल्या दुचाकीस्वार दोन तरुणांना भरधाव ट्रकने चिरडल्याची भीषण घटना बायपासवरील नाईकनगर कमानीजवळ बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ट्रक सोडून चालक पळून गेला. संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून केबीनच्या काचा फोडल्या. जमाव ट्रक पेटविण्याच्या तयारीत असतांना पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी ट्रक जप्त केला. दोन्ही तरुण आते- मामेभाऊ आहेत.

सचिन कल्याण राठोड (रा. नाईकनगर ,बायपास ) आणि नितेश कुंडलिक पवार (३२, रा. पोरगाव तांडा, ता. पैठण, ह. मु. शिवाजीनगर )अशी मयताची नावे आहेत. दोघे नात्याने आते - मामेभाऊ होते आणि दोघेही देवळाई येथील बाबाशेट यांच्याकडे जेसीबी ऑपरेटर(चालक) म्हणून कामाला होते. या भीषण अपघाताविषयी प्राप्त माहिती अशी की, सचिन आणि नितेश हे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास नाईकनगरकडुन झाल्टाफाट्याकडे मोटारसायकलवरून जात होते. नाईकनगर कमानीसमोर ते रास्ता ओलांडून झाल्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले. याचवेळी देवळाई चौकाकडुन झाल्टा फाट्याकडे सुसाट निघालेल्या मालवाहू ट्रकने त्यांना उडवले. या अपघातात सचिन आणि नितेश यांच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेले. दोघे गंभीर जखमी झाले आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडले. याघटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. 

अपघातानंतर जखमी दोघे सुमारे पंधरा मिनिटे तेथे पडून होते. प्रत्यक्षदर्शीनी या घटनेची माहिती पोलीस आणि रुग्णवाहिकेला कळविली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत मयताच्या नातेवाईकही तेथे आले होते. नितेश आणि सचिन यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना घाटी रुग्णालयात नेण्याचे सांगितले. अपघात विभागातील डॉक्टरांनी नितेश आणि सचिन यांना तपासून मयत घोषित केले. या अपघाताविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

संतप्त नागरीकांची ट्रकवर दगडफेकअपघातानंतर घटनास्थळी सचिन आणि नितेश ला पडलेले पाहुन संतप्त नागरीकानी त्यांना चिरडणाऱ्या ट्रकवर दगडफेक करून नुकसान केले. यावेळी जमाव ट्रक पेटवून देण्याच्या तयारीत होते. मात्र त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी जमावाला शांत केले. नितेश आणि सचिन यांना रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात पाठविले.

काही काळ वाहतूक कोंडीअपघातानंतर देवळाई चौकाकडुन झाल्टा फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख आणि गस्तीवरील जवाहरनगर , पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुंडलिकनगर पोलिसांनी ट्र्क जप्त केला आणि मयताच्या मोटारसायकल घटनास्थळावरुन हलविली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद