शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

उद्योगनगरीत गुंड, 'ब्लॅकमेलर' रोखा; वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांची प्रशासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 12:30 IST

कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे.

ठळक मुद्देप्रतिकूल परिस्थिती असूनही उद्योग टिकवून ठेवण्यासाठी उद्योजकांचे प्रयत्न सुरू आहेत.औद्योगिक क्षेत्रात गत दोन-तीन वर्षांपासून गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत.

वाळूज महानगर : औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी करून उद्योजकांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार वाढतच चालल्याने उद्योग बंद पडण्याची भीती उद्योजकांतून वर्तविली जात आहे. गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालण्याची गरज असल्याचा सूर उद्योजकांकडून आळवला जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही उद्योग टिकवून ठेवण्यासाठी उद्योजकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, औद्योगिक क्षेत्रात गत दोन-तीन वर्षांपासून गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. कंपनीत काम करताना कामगार जखमी झाल्यास किंवा अपघात झाल्यास गुंडगिरी करणारे कंपनीतील अधिकारी व उद्योजकांना धमक्या देतात. याशिवाय विविध धार्मिक उत्सव, महापुरुषांची जयंती व सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली गुंडगिरी करणारे कारखान्यात येऊन पैसे, तसेच अन्नधान्याची मदत करण्यासाठी दबाव आणतात. उद्योजकांनी मदतीस नकार देताच कंपनीच्या विरोधात शासकीय कार्यालयात तक्रारी करून उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो.

औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावाळूज उद्योगनगरीचा झपाट्याने विस्तार झाला असून, लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने न्याय मिळण्यास विलंब होतो. या भागात नागरी व औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.- नारायण पवार (अध्यक्ष मसिआ संघटना)

गुंडांवर कडक कारवाई कराकंपनीत काम करताना कामगाराचा अपघात झाल्यास अथवा काही घटना घडल्यास गुंडगिरी व दहशत पसरवून उद्योजक व कारखान्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. कामगारांवर अन्याय झाल्यास शासकीय यंत्रणेकडे दाद मागण्याऐवजी उद्योजकांना विनाकारण त्रास दिला जातो. या गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.- अजय गांधी (उद्योजक)

उद्योजकांना सुरक्षा देण्याची गरजउद्योगनगरीमुळे हजारो कामगारांना रोजगार मिळाला. शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गत काही दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरीचे प्रमाण वाढल्याने उद्योजकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. या भागातील गुंडगिरी मोडून उद्योजकांच्या सुरक्षेवर भर देण्याची आवश्यकता आहे.- अनिल पाटील (उपाध्यक्ष- मसिआ संघटना )

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद