शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्याचा सन्मानाने स्वीकार; 'राज'सभेचे आयोजक म्हणाले ही तर मोगलाईची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:43 IST

राजसभेसाठी घातलेल्या १६ पैक्की १२ अटींच्या उल्लंघनाचा अहवाल पोलीसांनी दिला असल्याची माहिती आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात १ मे रोजी झालेल्या सभेतील भाषणावरून गुन्हा दाखल झाला आहे. यात राज ठाकरे यांच्यासोबत सभेचे आयोजक राजू जावळीकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा सन्माने स्वीकार करतो, ही तर मोगलाई असल्याची प्रतिक्रिया जावळीकर यांनी यानंतर दिली आहे. गुन्ह्यासोबतच मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 

शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी झालेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटीशर्थीचे उल्लंघन झाल्याने सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तब्बल १६ अटी मनसेच्या राजसभेच्या आयोजनावर घातल्या होत्या. यातील १२ अटींचे उल्लंघन झाले असल्याचा पोलिस अहवालात असल्याची माहिती आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आयोजक राजू जावळीकर आणि इतरांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ अ आणि मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राजू जावळीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या गुन्ह्याचा आम्ही स्वीकार करतो. आमच्यासाठी अशा केस अंगावर घेणे नित्य आहे.मात्र, कार्यक्रम आयोजना दरम्यान पोलिसांनी खूप सहकार्य केले ते आता दिसत नाही. तेव्हा वाटत होते लोकशाही आहे. आता वाटते ही तर मोगलाईला सुरुवात आहे.

 

कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस ३ मे नंतर मशिदीवरील भोंगे बंद झाले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजविणार असा इशारा मनसेने दिला होता. या पार्श्वभूमीवर शहरारील मनसेच्या १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परंतु, आम्हाला स्थानबध्द केले तरी आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे शंभर टक्के पालन करण्यात येईल असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी