शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप जैस्वालांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून रावसाहेब दानवे म्हणाले, ‘हा आमचाच पक्ष’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 15:09 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आ. प्रदीप जैस्वाल यांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून ‘हा आमचाच पक्ष’ म्हटल्याने चर्चेला उधान

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यापूर्वी आ. प्रदीप जैस्वाल यांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून ‘हा आमचाच पक्ष आहे’, असे म्हटले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावरून राजकीय परिस्थितीवर चांगलीच चर्चा रंगली. शिवाय विशेष रेल्वे रवाना होताना नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये साजरी होत असून, त्यासाठी जाणाऱ्या शिवप्रेमींसाठी शनिवारी विशेष रेल्वे सोडण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या सोहळ्याच्या दृष्टीने आवश्यक परवानगी भाजपमुळेच मिळू शकली, अशी चर्चा सुरू असल्याविषयी माध्यमांनी त्यांना विचारणा केली. दानवे यांनी ‘हे शिवप्रेमी असून, कोण्या पक्षाचे नाही’, असे म्हटले. यावेळी सोबत उभे असलेल्या आ. सतीश चव्हाण यांच्याकडे हात दाखवित ‘हे व आम्ही दोन पक्षांचे आहोत’ असेही ते म्हणाले. त्यावर आ. चव्हाण यांनी तिसरा पक्षही आहे, असे म्हणत आ. प्रदीप जैस्वाल यांच्याकडे निर्देश केला. तेव्हा दानवे यांनी आ. जैस्वाल यांच्या गळ्यातील भगवे उपरणे हातात धरून ‘हा आमचाच पक्ष आहे...’ असे म्हटले. त्यावर उपस्थित प्रत्येक जण खळखळून हसला.

तुमच्यानंतर मी नाही बोलणार...रावसाहेब दानवे यांनी आ. चव्हाण यांना उपस्थितांशी बोलण्यास सांगितले; परंतु, तुम्ही बाेलले, त्यावर मी नाही बोलणार, असे आ. चव्हाण म्हणाले. नव्या रेल्वेला झेंडा दाखविताना रेल्वे प्रशासनाकडून ठरावीक आकाराच्या झेंड्याचा वापर केला जातो. या रेल्वेला रवाना करण्यासाठी काहींनी वेगळ्याच आकारातील झेंडे आणले होते; परंतु, ते झेंडे टाळत रेल्वे प्रशासनाच्याच झेंड्यांचा वापर करण्यात आला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालAurangabadऔरंगाबाद