शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीवर पावसाचा रूसवा कायम

By admin | Updated: July 30, 2014 01:03 IST

हिंगोली : मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असताना हिंगोलीत मात्र पावसाचा रूसवा गेलेला नाही.

हिंगोली : मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असताना हिंगोलीत मात्र पावसाचा रूसवा गेलेला नाही. परिणामी पावसात आघाडीवर राहणारा हिंगोली जिल्हा यंदा पिछाडीवर गेल्याने केवळ १३ टक्के पाऊस झाला. आजघडीला ४१३ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना केवळ ११६ मिमी पाऊस झाला. आता रास्त सुगीची आशा उरली नसताना खरीपाची पिकेही कडक उन्हामुळे वाळू लागली. हिंगोली जिल्ह्यात सरासरी ८९२ मिमी पाऊस पडतो. मागील वर्षी १ हजार ४०० मि.मी. पाऊस झाला होता. यंदा गतवर्षी एवढा पाऊस अपेक्षित नसला तरी वार्षिक सरासरी गाठण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र म्रगाप्रमाणे आर्द्राही कोरड्या गेल्या. तोपर्यंत सर्वच जिल्ह्यात पाऊस झाला. बरोबर १२ जुलै रोजी महिन्याच्या उशिराने पावसाचे आगमन झाले. संपूर्ण आर्द्राने दिलासा दिल्याने दीड महिन्यांच्या उशिराने पेरण्या झाल्या. नंतर पुनर्वसू नक्षत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. पुष्य नक्षत्राची सुरूवात कडक उन्हाने झाली. मेंढा वाहन असलेल्या या नक्षत्राचा शेवट २ आॅगस्ट रोजी होईल. दिवसेंदिवस कडक ऊन पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. आजघडीला ४१३ मिमी सरासरी अपेक्षित असताना ११६ मिमी पाऊस झाला. गतवर्षी ६८७ मिमी पावसाने मराठवाड्यात आघाडीवर होता. उलट सरासरीच्या बाबतीत हिंगोली पिछाडीवर आहे. औरंगाबाद, लातूर आणि उस्मानाबादेत चांगला पाऊस झाला. अद्यापही धूळ उडत असल्याने ३ आॅगस्ट रोजी येणाऱ्या आश्लेषा नक्षत्रावर आशा एकवटल्या. आता मूग, उडदाच्या दाळही मिळणे दुरापास्त होण्याची शक्यता वाटते. आर्थिक गणित अवलंबून असलेले सोयाबीन, कापसाच्या उत्पन्नात घट होईल. म्हणून सर्वत्र पावसासाठी पूजाविधी केला जात आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय सरासरी (मिमी) तालुका गतवर्षी यंदाहिंगोली७२२.६९ ८४.०१कळमनुरी६३६.०४१०९.०२वसमत ६२५.२८१०८.१४ सेनगाव६३७.०८११६.६४औंढा८१६.६२१६३ एकूण६८७.५६१०१.८७ जिल्हानिहाय पडलेला पाऊस व टक्केवारी (मिमी)जिल्हा सरासरीअपेक्षित पडलेला टक्केवारीगतवर्षीचाऔरंगाबाद ६७५.४५२८९.७२ १५२.९९२२.६५३२८.११ जालना ६८८.३२३००.६९ १०४.१५१५.१३४१९.२६परभणी ७७४.५९३२६.३६ ११०.७३१४.०३४६१.२८हिंगोली ८९२.७६४१३.३५ ११६.०४१३.०४६८७.५६नांदेड ९५५.५५४२४.३४ १२०.४९१२.६१५९९.७७बीड ६६६.६७२७९.०६ १२७.२९१९.१८३४७.६२लातूर ८०२.१३३२९.७१ १७०.५८२१.२७४४८.८२उस्मानाबाद ७७६.८३२९४.८९ १४७.६२१९.००३१४.०२एकूण ७७९३३२.३३ १३४.३४१६.९१४५०.८३