शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

हिंगोलीत भरदिवसा घरफोडी; सोन्याचे दागिने रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 7:09 PM

शहरात भरदिवसा चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून चोरी झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

हिंगोली : शहरातील बांगरनगर येथे आज दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून कपाटातील दहा तोळे सोने व दहा हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला. शहरात भरदिवसा चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून चोरी झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

हिंगोली शहरातील गजबजलेल्या ठिकाणी बांगरनगर आहे. परंतु या गजबजलेल्या वस्तीतच भरदिवसा चोरी झाली. बांगरनगर येथील सुर्यकांत परसराम बांगर यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली. मुलाच्या अडमिशनसाठी ते घराबाहेर पडले होते. परंतु घरी परत येताच त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात प्रवेश करताच बांगर यांना लोखंडी कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे दिसून आले.

चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून सोने व रोकड लंपास केले. हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल व पोलीस कर्मचारी पंचनामा करत असून याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. लवकरच गुन्हा दाखल करून घेतला जाईल असे पोनि चंदेल यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. भरदिवसा शहराच्या ठिकाणी चोरी झाल्याने याबाबत नागरिकांत एकच चर्चा होत आहे.

टॅग्स :theftचोरीHingoli policeहिंगोली पोलीसRobberyचोरी