शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

फोडणीला हिमाचलच्या लाल लसणाचा तडका; छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात झाली आवक

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 3, 2023 17:25 IST

छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच हिमाचलचा लसूण विक्रीला आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : लसणाशिवाय भाजीला फोडणी देण्याचा गृहिणी विचारही करू शकत नाही. मग, तो कितीही महाग झाला तरी छटाक का होईना लसूण खरेदी केला जातोच. आता तर फोडणीची चव वाढविण्यासाठी भाजीमंडईत खास हिमाचलच्या डोंगरी भागातून लालसर लसूण आला आहे. हिमाचलचा लसूण थेट तुमच्या खाण्यात येणार आहे.

लसणासाठी शिमला प्रसिद्ध अनेक जण दरवर्षी सहलीसाठी शिमल्याला जात असतात. हा शिमला जिल्हा लसणासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय हिमाचलमधील सोलन, सिरमौर या जिल्ह्यांत लसणाचे विक्रमी उत्पादन होते. या राज्यातून बांगलादेश, नेपाळ या देशांतही लसूण निर्यात होत असतो. दरवर्षी सोलन भाजीमंडीत वर्षभरात १५० कोटींची उलाढाल फक्त लसणाची होत असते. देशात पंजाब, हरयाणा व दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिमाचलचा लसूण विकला जातो.

पहिल्यांदाच आला हिमाचलचा लसूण : छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच हिमाचलचा लसूण विक्रीला आला आहे. जाधववाडी कृउबा अडत बाजारात एक ट्रक भरून लसूण आला. लाल रंगाचा व मोठ्या आकारातील हा लसूण औरंगपुरा भाजीमंडईत ३५० रुपये किलोने विकला जात आहे, तसेच आपल्या जिल्ह्यातील गावरान लसूणही ३५० रुपयांनी, तर हायब्रिड लसूण २०० रुपये किलोने विकला जात आहे. हा हिमाचलचा लसूण ग्राहक आर्वजून खरेदी करीत असल्याची माहिती लसूण विक्रेता संजय वाघमारे यांनी दिली.

हिमाचलच्या लसणाची काय वैशिष्ट्ये : सर्व प्रकारचा लसूण आरोग्यासाठी लाभदायक असतो. हिमाचलच्या लसणातही अँटिऑक्सिडेंट मोठ्या मात्रेत आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सोडियम, फायबर, व्हिटॅमिन-सी, मँगनीज, व्हिटॅमिन-बी ६ या लसणात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfoodअन्न