शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
8
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
9
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
10
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
11
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
12
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
13
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
14
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
15
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
16
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
17
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
18
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
19
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
20
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

औरंगाबादेत हिजाब गर्लचा सत्कार सोहळा रद्द; वंचित-एमआयएफला पोलिसांनी नाकारली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:45 IST

हिजब गर्ल मुस्कान खानचा आज आमखास मैदानावर वंचित-एमआयएफतर्फे भव्य सत्कार होणार होता

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी आमखास मैदानावर आयोजित प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्यासह महापुरुषांचा अपमान केल्यास कठोर कारवाईचे विधेयक विधानसभेत मांडल्याबद्दल आणि कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा भव्य सत्कार सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी आयोजकांना परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र दिले. दरम्यान, आयोजकांनी कोर्टात धाव घेतल्याची माहिती आहे. 

वंचित-एमआयएम यांची युती तुटल्यानंतर उदयास आलेल्या वंचित-एमआयएफ या नव्या आघाडीच्या शहरातील पहिल्याच कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. यात काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील एका शाळेत गणवेशावरून वादंग उठले होते. यात हिजाब गर्लच्या भूमिकेने देशभरातील वातावरण ढवळून निघाले. याच हिजाब गर्लच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्यासह महापुरुषांचा अपमान केल्यास कठोर कारवाईचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले आहे, यावर संवाद साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, रविवारी दिवसभर सोशल मीडियावर वंचित-एमआयएफच्या कार्यक्रमाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगीच दिली नाही, मुस्कान खान येणारच नाही, अशा पोस्ट एका पक्षाच्या समर्थकांनी टाकायला सुरुवात केली. 

एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी तर सुपारी घेऊन हा कार्यक्रम असून, औरंगाबादकर सुजान आहेत, अशीही पोस्ट टाकली. मात्र, कार्यक्रमास परवानगी मिळाली आहे, सोमवारी आमच्या स्वयंसेवकांना पोलीस मार्गदर्शन करतील, अशी माहिती देत वंचितकडून देण्यात येत होती. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली,तशी माहिती आयोजकांना देण्यात आली. यामुळे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, हिजाब गर्ल मुस्कान आणि एमआयएफ हे कार्यक्रमात काय बोलतील याबद्दलची उत्सुकता संपली आहे. दरम्यान, परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची साज सायंकाळी पत्रकार परिषद होणार आहे. यात ते कोणावर निशाना साधतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

आयोजक हायकोर्टात सभा आणि सत्कार सोहळा रद्द करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाविरोधात आयोजकांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. याबाबत वंचितचे प्रवक्त फारूक अहमद यांनी सांगितले की, आजच्या सभेस येणाऱ्या मुस्कान खान यांना औरंगाबाद पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या माध्यमातून घराबाहेर पडण्यास बंदी आणली. तसेच रात्री ११ वाजता सभेस परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र दिले. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात आयोजकांनी दाद मागितली आहे. न्यायालयाने २२ तारखेला पोलिसांना सभा का रद्द केली याबाबत बाजू मांडण्यास सांगितले आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी