शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
5
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
6
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
7
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
8
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
9
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
10
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
11
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
12
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
13
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
14
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
15
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
16
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
17
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
18
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
19
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

उच्चशिक्षितांसह नोकरी करणारेही बेरोजगारांच्या रांगेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 11:42 IST

महारोजगार मेळाव्यात १५३२ जणांना रोजगार, १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड

औरंगाबाद : कोणी इंजिनिअर्स, तर कोणी पदव्युत्तर पदवी धारण केलेले, एवढेच काय; सध्या नोकरीत असलेलेही बेरोजगारांच्या रांगेत उभे. ही परिस्थिती पाहायला मिळाली आयटीआय येथील महारोजगार मेळाव्यात.चांगली नोकरी मिळेल, या आशेने औरंगाबादच नव्हे, तर इतर जिल्ह्यातील युवक-युवतींनीही हा मेळावा गाठला होता. या मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशीही रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांत १५३२ जणांना रोजगार मिळाला, तर १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड झाली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता, ॲप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याचा रविवारी समारोप झाला.

शिकाऊ उमेदवारांची स्थितीविविध ६८ कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत ३ हजार २० ॲप्रेंटिसशिपची पदे होती. यासाठी २ हजार ८७५ उमेदवारांनी नोंदणी केली. पैकी १,१९६ पात्र उमेदवारांची निवड झाली. या व्यतिरिक्त मेळाव्यात बारावी व्होकेशनल (किमान कौशल्य) शिक्षण घेतलेल्या २७३ उमेदवारांची २२ विविध कंपन्यांत निवड झाली, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभिजित आल्टे यांनी दिली.

रोजगारातील परिस्थितीदोन दिवसांत ३५१४ जणांच्या मुलाखती झाल्या. यात १,२५९ जणांची प्राथमिक निवड झाली, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस. आर. वराडे यांनी सांगितले.

काहींना फक्त आश्वासनमेळाव्यात एकूण ५३१२ पदे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. एकूण ६३८९ जणांनी नोंदणी केली. त्यात २७२८ जणांची निवड झाली. नंतर काॅल करू, असे सांगून पाठविण्यात आल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

एकाच जागी अनेक संधी या मेळाव्याच्या माध्यमातून एकाच जागी विविध कंपन्या आल्या. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. दोन कंपन्यांकडे अर्ज केला आहे.- विद्या छापरवाल

सध्या जाॅब सुरू, पण..मेळाव्यासाठी सिल्लोडहून आलो. यापूर्वी येथेच झालेल्या मेळाव्यात ॲप्रेंटिससाठी निवड झाली होती. अधिक वेतनाचा जाॅब मिळेल, या दृष्टीने आलो आहे.- अजिनाथ पडूळ

कुटुंबाची जबाबदारीमाझे एम. काॅम झालेले आहे. सध्याही जाॅब सुरू आहे. मात्र, कमी वेतन आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे चांगल्या वेतनाची नोकरी मिळेल, यासाठी आले.- अर्चना बुबने

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण