शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

समृद्धी महामार्गालगत ताशी २५० किमी वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे पुन्हा अजेंड्यावर

By विकास राऊत | Updated: August 12, 2025 19:16 IST

हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्याने प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव साडेतीन वर्षांपासून गुलदस्त्यात राहिल्यानंतर आता पुन्हा त्यावर चर्चा सुरू झाली आहे. १० ऑगस्ट रोजी नागपूर येथील एका कार्यक्रमात समृद्धी महामार्गालगत हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्याने प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत आहेत. 

जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा १११ किलोमीटरचा ट्रॅक समृद्धी महामार्गालगत बांधणीचा विचार होऊन साडेतीन वर्षे झाली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडकडे (एनएचआरसीएल) यासाठी डीपीआर करणार होते. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर ऑफिसही सुरू करण्यात आले होते. ते कार्यालय निवडणूक आचारसंहितेसाठी आता पालकमंत्री कक्षासाठी वापरले जात आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?समृद्धी महामार्गाला लागून समांतर हायस्पीड रेल्वे जी ताशी २५० ते ३०० वेगाने धावेल असा प्रस्ताव होता. समृद्धीचे बांधकाम होत असताना रेल्वे मंत्रालयाने नागपूर ते मुंबईपर्यंत हायस्पीड रेल्वेवर अभ्यास केला आहे. ७८ टक्के काम गतीने होणे शक्य होते. २२ टक्के काम सयुंक्तपणे करावे लागणार आहे. याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून निर्णय घेऊ- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (१० ऑगस्ट, नागपूर)

हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित प्रकल्प असा होता: एकूण लांबी : ७४९ किलोमीटरकिती स्थानके? : १२

किती जिल्हे जोडणार? : १०भूसंपादन किती? : १२४५.६१ हेक्टर

रेल्वेचा ताशी वेग किती? : ३३० ते ३५० कि.मी.प्रवासी वाहतूक क्षमता : ७५०

एकूण किती बोगदे? : १५, लांबी : २५.२३ कि. मी.समृद्धी महामार्गालगत १७.५ मीटर रुंदीचा मार्ग

या ठिकाणी रेल्वे स्टेशनअजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रुक, शहापूर, ठाणे या १४ ठिकाणी एचएसआर स्टेशन बांधणे प्रस्तावित होते.

किती भूसंपादन करावे लागेल?जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४९ गावांलगत १११ कि.मी. अंतरातून हायस्पीड रेल्वेचा मार्ग प्रस्तावित आहे. यासाठी जिल्ह्यातून १६७.९६ हेक्टर जमीन संपादित करावी लागेल. त्यात ७३.७३ हेक्टर जमीन खाजगी तर ९४.२२ हेक्टर जमीन सरकारी असेल. सरकारी २०१ तर ४१० खाजगी भूखंड संपादित करावे लागतील. संभाजीनगर तालुक्यातील २३ गावांतील ६१.९४ हेक्टर, गंगापूरमधील ११ गावांतील ३७.१० तर वैजापूरमधील १५ गावांतील ६७.९० हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गrailwayरेल्वेnagpurनागपूर