शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीडचे तत्कालीन सीईओ अमोल येडगे यांना अवमानप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:14 IST

शिक्षकांना पदस्थापनेवर सामावून घेण्याचे प्रकरण

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन नाही  

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे दाखल ‘अवमान याचिके’च्या अनुषंगाने बीडचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला आहे. अवमान याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

आंतर जिल्हा बदलीने बीड जिल्ह्यात बदलून आलेल्या शिक्षकांना सामावून घेण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. त्या आदेशाचे पालन झाले नसल्यामुळे दाखल ‘अवमान याचिके’च्या अनुषंगाने कारवाई का करू नये, अशी कारणेदर्शक नोटीस बजावण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. विठ्ठल श्यामराव पवार व इतर पाच शिक्षकांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.  त्यात त्यांनी म्हटल्यानुसार २०१८ मध्ये शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार इतर जिल्हा परिषदेतून बदली झालेले याचिकाकर्ते बीड जिल्हा परिषदेत रुजू होण्यासाठी आले होते. याचिकार्ते आल्यानंतर मात्र, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पदे रिक्त नसल्याचा मुद्दा पुढे करून संबंधित शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्या शिक्षकांनी खंडपीठात याचिका दाखल केली.

खंडपीठाने याचिका मंजूर करून घेत याचिकाकर्त्या शिक्षकांना दिलेल्या पदस्थापनेवर सामावून घ्यावे, तशी जागा नसेल तर इतर ठिकाणी रुजू करून घ्यावे, असे आदेश दिले. त्या आदेशाविरुद्ध बीड जिल्हा परिषदेने पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. खंडपीठाने जिल्हा परिषदेने सादर केलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्या शिक्षकांना पदस्थापना देण्याचे   आदेश दिले होते. असे असताना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली   नाही. त्यामुळे खंडपीठाने येडगे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठBeedबीडTeacherशिक्षक