शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएसओ’मुळे ग्रा.पं.होणार हायटेक

By admin | Updated: August 21, 2014 23:25 IST

विठ्ठल भिसे, पाथरी ई-पंचायत ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्रामपंचायतींना संग्राम कक्ष बनविण्यात आले

विठ्ठल भिसे, पाथरीई-पंचायत ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्रामपंचायतींना संग्राम कक्ष बनविण्यात आले. त्यानंतर आता ग्रामपंचायती आयएसओ करून हायटेक करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू झाला आहे. परभणी जिल्ह्यात ९० ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आयएसओ करण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत. २८ आॅगस्टपर्यंत यासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या गतवर्षीपासून आयएसओ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक अंगणवाड्यांच्या परिसरात सर्व भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याच बरोबर गुणवत्तेमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने आता ग्रामपंचायती आयएसओ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तयारी करून घेतली जात आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत विकासाचा महत्त्वाचा दूवा समजला जातो. ग्रामपंचायतींना सहाय्यता मिळाल्यापासून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ लागला आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाबत मात्र आजपर्यंत फारसे लक्ष देण्यात आले नाही. ग्रा़ पं़ ना कार्यालय उपलब्ध नसल्याने ग्रा़ पं़ चा कारभार सरपंचाच्या घरूनच चालायचा. ग्रामसेवकांची बॅग सांभाळणारे लोकप्रतिनिधी असायचे. परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे. संत गाडगे बाबा अभियान, तंटामुक्त अभियान, पर्यावरण संतूलित समृद्ध ग्राम योजना, निर्मलग्राम, नरेगासारख्या योजनेमुळे ग्रा.पं. कारभारात अमुलाग्र बदल झाले आहेत. टेबल, खूर्च्या उपलब्ध नसणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आता संगणक कक्ष तयार झाले आहेत. तेराव्या वित्त आयोगातून शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामपंचायतीमध्ये मोठी सुधारणा होऊ लागल्याने आता ग्रामपंचायती ‘आयएसओ’ करून हायटेक केल्या जाणार आहेत. ग्रा. पं. कार्यालयात भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यापासून ते सामाजिक कामात ग्रामपंचायतीचा सहभाग या मोहिमेत वाढविला जाणार आहे. जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात ९० ग्रामपंचायती आयएसओसाठी प्रास्तावित करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतीचे नामांकन २८ आॅगस्टपर्यंत केले जाणार आहे. त्यानंतर विशेष पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींना सुधारण्यासाठी वेळ मिळणार आहे. यामुळे ग्रामपंचायत आयएसओ करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.