शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तोतया परीक्षार्थी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 12:12 IST

Hi-tech copy in police recruitment exam : पोलीस चालक भरती प्रक्रियेसाठी शहरातील दहा केंद्रांवर लेखी परीक्षेेचे आयोजन बुधवारी सकाळी १० ते ११.३० वाजे दरम्यान करण्यात आले होते.

ठळक मुद्देएमआयटी केंद्रावर तोतया विद्यार्थी पकडला चिकलठाण्यात कॉपी करताना विद्यार्थी पकडला

औरंगाबाद : पोलीस चालक भरती परीक्षेत एमआयटी येथील परीक्षा केंद्रावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे तोतया परीक्षार्थी पकडल्या गेला. चिकलठाणा येथील केंद्रावर एका परीक्षार्थीला टेक्नॉलॉजीचा वापर करून कॉपी (नक्कल) करताना रंगेहाथ पकडले. या दोन्ही प्रकरणांत सातारा व एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीस चालक भरती प्रक्रियेसाठी शहरातील दहा केंद्रांवर लेखी परीक्षेेचे आयोजन बुधवारी सकाळी १० ते ११.३० वाजे दरम्यान करण्यात आले होते. यात ३ हजार ३६० विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. एमआयटी महाविद्यालयातील केंद्रावर पोलीस उपनिरीक्षक एस. शिरसाठ, अनिता फासाटे, शिपाई के.एच. खिल्लारे, सुरेश चव्हाण, मंगेश जाधव, गोपाल देठे आणि सुचित्रा देव कार्यरत होते. प्रत्येक परीक्षार्थीचे ओळखपत्र, आधार कार्ड पाहूनच आतमध्ये सोडण्यात येत होते. ९ वाजून ४५ मिनिटांनी एक अल्पवयीन मुलगी धावत प्रवेशद्वारावर आली. तिला नाव विचारले असता पूजा दिवेकर असे सांगितले. मात्र तिच्या हॉलतिकीटवरील छायाचित्र वेगळेच दिसत होते. 

हेही वाचा - २० सप्टेंबरपासून विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तरच्या फेरपरीक्षा; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निर्णय

विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने पूजा रामदास दिवेकर (रा. स्वामी विवेकानंदनगर, एन १२, हडको) या परीक्षार्थीच्या नावावर परीक्षा देण्यास आले असल्याचे सांगितले. तसेच यासाठी तिला रणजीत राजुपत (बहुरे) (रा. शेकटा, ता. औरंगाबाद) हा मदत करीत असून, पैसे देणार होता. तोतया परीक्षार्थीचा भंडाफोड झाल्यानंतर उपनिरीक्षक फासाटे यांनी त्या अल्पवयीन मुलीची अंगझडती घेतली असता, तिच्याकडे मोबाइल, मायक्रो माईक, स्पाय डिवाइस, ब्ल्यूटुथ डिवाइस, बोगस कलर आधार कार्ड आढळून आले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीसह मूळ परीक्षार्थी पूजा दिवेकर, रणजी राजपूत यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अत्याधुनिक साधनांतून कॉपीचिकलठाणा येथील न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर राहुल मदन राठोड (वय २३, रा. पारुंडी तांडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) हा परीक्षार्थी मोबाइल, मास्टर कार्ड ब्ल्यूटुथ कनेक्टर डिव्हाईस, ब्ल्यूटुथ मख्खी एअर फोन असे साहित्य आढळून आले. परीक्षा केंद्रावर पोलीस निरीक्षक व्ही.एस. पोटे, उपनिरीक्षक अमरनाथ नांगरे, एस.बी. मांटे, दिनकर सोनगिरे यांच्यासह इतरांनी या परीक्षार्थीस पकडले. त्याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी