शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बगळ्यांनी वसवलं पुन्हा गणगोत सारं ! रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीतील झाडावर घरटी

By संतोष हिरेमठ | Updated: June 5, 2025 13:30 IST

लोकमत इम्पॅक्ट: रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीच्या मध्यभागी वाचलेल्या झाडावर पुन्हा एकदा घरटी

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशनची नवीन भव्य दिव्य इमारतीच्या मधोमध एक झाड आजही भक्कमपणे उभे आहे आणि या झाडाच्या फांद्यांवर पुन्हा एकदा बगळ्यांनी आपले गणगोत वसवले आहे. बगळ्यांनी झाडावर घरटी तयार केली आहे. गतवर्षी नव्या इमारतीसाठी याच झाडावर कुऱ्हाडीचे घाव पडणार होते. मात्र, ‘लोकमत’च्या वृत्ताने हे झाड वाचवून नव्या इमारतीचे बांधकाम रेल्वे प्रशासनाला करावे लागले.

नव्या इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी झाडांवरील बगळ्यांची घरटे स्थलांतरित करण्यात आली. याविषयी ‘लोकमत’ने ६ ऑगस्ट २०२४ रोजी ‘पुन्हा उसवतंय गणगोत सारं’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत वन विभागाने रेल्वे स्टेशन परिसरात दुसऱ्याच दिवशी धाव घेतली. यावेळी बगळ्यांची पिले परिसरातील अन्य झाडांवर स्थलांतरित करण्यासाठी बांबूच्या टोपल्या वापरल्याचे समोर आले होते.

वृत्तानंतर इमारतीच्या डिझाइनमध्ये केला बदल७ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. ज्या झाडांवर कुऱ्हाड पडणार होती, ती झाडे वृत्तामुळे वाचली. झाडे वाचवून बांधकाम करण्यासाठी इमारतीच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर अखेर ही झाडे वाचवून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. झाडाच्या बाजूने इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आता या झाडांवर बगळ्यांनी पुन्हा घरटी बांधली आहेत.

पक्षांचा संसार आता नव्याने सुरू‘लोकमत’ने रेल्वे स्टेशन परिसरातील सारंगा घर असलेल्या झाडांची बातमी केली. रेल्वे प्रशासनाच्या नवीन इमारतीच्या आराखड्यामध्ये बांधकामात बगळ्यांचे वास्तव्य आहे, अशी तोडली जाणारी झाडे आता वाचली आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या पक्षांचा संसार आता नव्याने येथे सुरू झालेला आहे, हे समाधानाची भाव आहे. लोकमत वृत्तपत्राचे पर्यावरणप्रेमींकडून आभार व्यक्त करण्यात करताे.- डाॅ. किशोर पाठक, मानद वन्यजीवरक्षक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरenvironmentपर्यावरणrailwayरेल्वे