शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘एमटीडीसी’चा हेरिटेज वॉक दोन महिन्यातच बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:16 IST

केवळ दोन महिन्यांतच अधिकाºयांचा उत्साह ओसरल्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम बंद पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केवळ दोन महिन्यांतच अधिकाºयांचा उत्साह ओसरल्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम बंद पडला. लोकांचा मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता ‘एमटीडीसी’ने हा उपक्रम बंद करून ‘औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी’तर्फे आयोजित केल्या जाणाºया हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.खासगेट नामशेष झाल्यानंतर शहरातील काही इतिहासप्रेमींनी ‘औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी’च्या माध्यमातून एकत्र येऊन ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू केला होता. हे पाहून पर्यटन विभागालाही त्यांच्या बंद पडलेल्या ‘हेरिटेज वॉक’ची आठवण झाली आणि त्यांनी जून महिन्यात तो सुरू केला.त्यानुसार सोनेरी महाल, नौखंडा पॅलेस आणि भडकल गेट येथे भेट देण्यात आली. दरवेळी लोकांची संख्या कमी होत गेली. महिन्याच्या पहिल्या व तिसºया शनिवारी वॉक आयोजित करण्याचे मंडळाचे नियोजन होते. मात्र, ५ आणि १९ आॅगस्ट या पहिल्या व तिसºया शनिवारी वॉक झाला नाही.डॉ. रफत व दुलारी कुरेशी या इतिहास अभ्यासक दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यापासून नियमित हेरिटेज वॉकचे यशस्वी आयोजन केले जात आहे. त्यांच्या उपक्रमांना शेकडो लोकांची उपस्थिती असते. ‘एमटीडीसी’ला ‘औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी’च्या यशस्वी ‘मॉडेल’चे अनुकरण करणे जमले नाही. त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळालाच नाही. म्हणून त्यांच्यावर हा उपक्रम पुन्हा बंद करण्याची वेळ आली. तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या पुढाकाराने शहरातील वास्तूंबद्दल नागरिकांना माहिती व्हावी व जनजागृती वाढावी या उद्देशाने गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात ‘एमटीडीसी’द्वारे हेरिटेज वॉक सुरू करण्यात आला होता. मात्र, कोणतीही पूर्वसूचना अथवा स्पष्टीकरण न देता तो त्यावेळी बंद करण्यात आला होता.