शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हेल्पलाईन १०९८/११२; कृती दलाने वर्षभरात रोखले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७५ बालविवाह

By विजय सरवदे | Updated: May 9, 2024 16:52 IST

शासकीय यंत्रणा सतर्क, अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली असून वर्षभरात ७५ बालविवाह रोखण्यात कृती दलाला यश आले आहे. त्यातील तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, १० मे रोजी ‘अक्षय तृतीया’ असून हा मुहूर्त साधून बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा, तालुका व गावपातळीवरील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांनी कळविले आहे की, बालविवाह होत असल्याची किंवा तशी तयारी केली जात असल्याचा संशय आल्यास सजग नागरिकांनी यासंबंधीची माहिती शासनापर्यंत पोहोचवावी. संबंधितांचे नावाची गोपनीयता राखली जाईल. जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाकरीता जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कायद्याची जाणीव व्हावी, यासाठी तसेच बालवयात कोणताही बालक हक्कांपासून वंचित राहू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे कामकाज सुरू आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असताना विवाह केल्यास तो विवाह बालविवाह म्हणून गणला जातो. त्यासाठी १ लाख रुपये दंड व २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा किंवा दोन्ही, असे शिक्षेचे प्रावधान आहे.

ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारीगावपातळीवर ग्रामसेवक, तर नागरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या परिसरात वा गावात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपण संबंधितांकडे माहिती देऊ शकता.

हेल्पलाईन १०९८ किंवा ११२जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असतील किंवा होऊ घातले असतील, तर नागरिकांनी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ किंवा ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. बालविवाहाबाबतची माहिती जवळचे पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, बालकल्याण समिती, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयातही देता येईल.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी