शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमची विधानसभेसाठी महाविकास आघाडीला साद; राज्यातील ३० जागांवर चाचपणीही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:22 IST

एमआयएमला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीचा फायदाच, इम्तियाज जलील यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेची लाट विधानसभेतही राहील, या भ्रमात शरद पवार, उद्धव ठाकरेंनी राहू नये. एमआयएम पक्षाला सोबत घेतल्यास त्यांना फायदाच होईल, अन्यथा नंतर पराभव झाल्यास आम्हाला जबाबदार धरू नका, असे सांगत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्ष महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलील यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, माझा लोकसभेतला पराभव हा जरांगे फॅक्टरमुळे झाला. एकटा लढूनही मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो, यातच पक्षाचे जिल्ह्यातील महत्व स्पष्ट होते. शरद पवार यांची अद्याप मी भेट घेतलेली नाही. मात्र, महाविकास आघाडीसोबत एमआयएम विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. आम्ही अनावश्यक मागण्या करणार नाही. आघाडीच्या नेत्यांनी एमआयएमचे महत्व ओळखून सहभागी करून घ्यावे. मी चर्चेसाठी कधीही यायला तयार आहे. पण नकार दिल्यास नंतरच्या पराभवाला आम्हाला जबाबदार धरू नका, असा इशारा देखील त्यांनी दिला. शिवाय, २९ ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील आराखडा निश्चित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

३० जागांसाठी चाचपणीशहरातील मध्य, पूर्व मतदारसंघासह राज्यातील ३० जागांसाठी आमची चाचपणी सुरू आहे. बीड, मालेगाव, विदर्भ व मुंबईतील दोन मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित असून ३० जागांसाठी चाचपणी सुरू आहे. शहरात माझ्यासह सर्व इच्छुकांच्या अनुषंगाने मोठ्या एजन्सीतर्फे सर्व्हे सुरू आहे. त्यांच्या निष्कर्षानंतर उमेदवार व मतदारसंघ निश्चित केला जाईल, हे सांगताना जलील यांनी स्वत: विधानसभा लढणार असल्याचेही संकेत दिले.

आघाडी, युतीत खंजीर घेऊन बसतातसध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महाविकास आघाडी, महायुतीमधील नेते सोबत खंजीर घेऊन एकमेकांसोबत राहतात. यातील कोण कधी खंजीर उपसेल, याचा अंदाज नाही. मात्र, समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास निश्चित फायदाच, असेही जलील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी