शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर भुयारी मार्गात उंचीची ‘कोंडी’; मोठ्या वाहनांचा विचारच नाही, कोंडीचा प्रश्न कायम

By संतोष हिरेमठ | Updated: January 13, 2024 13:18 IST

भुयारी मार्ग झाल्यानंतरही वाहतूक खोळंबण्याचा प्रश्न कायम राहण्याची भीती

छत्रपती संभाजीनगर : मोठ्या प्रतीक्षेनंतर शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू झाले; मात्र या भुयारी मार्गाच्या ‘उंची’चीच कोंडी झाली आहे. भुयारी मार्ग झाल्यानंतर मोठी वाहने भुयारी मार्गातून जाणार नसल्याची स्थिती आहे. त्यातून भविष्यात भुयारी मार्ग अडचणीचाच ठरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून भुयारी मार्गाची उंची आताच अधिक ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली. या भुयारी मार्गाच्या कामाला वर्षभराचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. सातारा-देवळाई, सिंदोन-भिंदोन, बाळापूरसह लगतच्या भागातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे; परंतु हा भुयारी मार्ग केवळ छोट्या वाहनांना नजरेसमोर ठेवूनच तयार केला जात असल्याने भविष्यात तो किती उपयोगी ठरेल? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाची उंची कमी राहिल्यास भविष्यात मोठ्या वाहनांचा भार संग्रामनगर उड्डाणपुलावरच राहील.

किती आहे शिवाजीनगर भुयारी मार्गाची उंची?शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी रेल्वे रुळाखाली वाहनांना ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र बाॅक्स करण्यात येणार आहे. या बाॅक्सची लांबी ५.५० मीटर आणि उंची ३.५० मीटर राहणार आहे, तर संपूर्ण भुयारी मार्ग हा २२.७६ मीटर लांब असणार आहे. ६.४२ कोटी रुपयांच्या खर्चातून हा भुयारी मार्ग होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संग्रामनगर भुयारी मार्गाची उंची किती?संग्रामनगर उड्डाणपूल उभारल्यानंतर नागरिकांनी पाठपुरावा करून येथे भुयारी मार्ग करण्यास रेल्वे प्रशासनाला भाग पाडले. या भुयारी मार्गावर लांबी आणि उंची नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार या भुयारी मार्गाची उंची ३.१० मीटर या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे.

उंची वाढविण्याची मागणी करूरेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन वेगवेगळ्या एजन्सींकडून शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. हे काम मुदतीत झाले पाहिजे. भुयारी मार्गातून मोठ्या बस, मोठी वाहने जाणार नाही. मिनी स्कूल बस जातील. भविष्याचा विचार करून भुयारी मार्गाची उंची वाढविण्याची मागणी केली जाईल.- ॲड. शिवराज कडू पाटील, उच्च न्यायालय

मोठी वाहने नाही जाणारशिवाजीनगर भुयारी मार्गातून मोठी वाहने जाणार नाही, असे समजले आहे. शाळेच्या बस, मिनी बस येथून सहजपणे जातील, अशी उंची हवी. त्यासाठी आताच लक्ष दिले पाहिजे. अन्यथा भविष्यात भुयारी मार्ग गैरसोयीचा ठरू शकतो.- बद्रिनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती

मोठ्या वाहनांचा विचार केला नाहीसंग्रामनगर येथे भुयारी मार्ग करताना मोठ्या वाहनांचा विचार करण्यात आला नाही. येथून केवळ कार जाऊ शकते. शहर बसही जाऊ शकत नाही. भविष्यात वर्दळ वाढली तर मोठी वाहने येथून जाऊ शकणार नाहीत.- श्रीमंत गोर्डे पाटील, अध्यक्ष, मेट्रो औरंगबाद असोसिएशन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी