शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

भारीच! जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी झाले ‘कोडिंग’मध्ये ‘मास्टर’

By राम शिनगारे | Updated: February 8, 2024 17:38 IST

जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्साहात : तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देत कोडिंगमध्ये मास्टर करण्यात आले आहे. हा उपक्रम शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आला होता. त्यासाठी ६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवित कोडिंगचे प्रशिक्षण घेतले आहे.

शालेय शिक्षण विभागाने अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोड टू एनहान्स लर्निंग संस्थांच्या सहकार्याने दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव नुकताच घेतला. त्यात जि. प., मनपाच्या शाळांमधील ग्रामीण, आदिवासी आणि शहरातील ६ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी ३ हजार विद्यार्थ्यांनी अनप्लग चॅलेंज (संगणकाशिवाय) सोडवले. या विद्यार्थ्यांपैकी अनप्लग चॅलेंजमधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची जिल्हास्तरावरील १० शाळांमधील ३० विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड केली. निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफाॅर्मवर कोडिंग करत त्यावर समस्यांवर उपाय शोधून कोडिंगच्या सहाय्याने गेम, ॲनिमेशन आणि ॲप्लिकेशन स्वरूपात प्रकल्प तयार केले. कोडिंग प्रकल्प तयार करताना विद्यार्थी एकविसाव्या शतकातील कौशल्ये जसे की, चिकित्सक विचार, सहकार्य, संवाद कौशल्ये, समस्या निवारण यांचा वापर केला आहे. याविषयी इतरही प्रोग्राम बनविण्यात आले.

वैजापूरची शाळा प्रथम तर जि. प.ची द्वितीयया उत्सवात वैजापूर येथील नगरपरिषदेच्या मौलाना आझाद विद्यालयाने प्रथम तर शिंदेफळ येथील जि. प.च्या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन शाळांतील तीन विद्यार्थी व एका शिक्षकाचे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे. सहभागी दहा शाळांमधील पाच शाळांना ४३ इंची एलईडी टीव्ही, तर पाच शाळांना टॅब व रोख बक्षिसे देण्यात आली. यावेळी डाएटच्या प्राचार्या डॉ. वैशाली कांबळे, अधिव्याख्याता डॉ. उज्ज्वला करवंदे, डॉ. प्रमोद कुमावत, सहायक कार्यक्रमाधिकारी डॉ. सोज्वल जैन, इरफान ललाणी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादscienceविज्ञानEducationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळा