शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील तीनशे मंडळांत दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:10 IST

मराठवाड्यातील ४२१ पैकी ३०० मंडळांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे, तर १२१ मंडळांमध्ये आजवर फक्त पावसाची हजेरी लागली आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील बहुतांश सर्व मंडळांमध्ये १०० टक्क्यांच्या आसपास पाऊ स झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ३०० मंडळांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे, तर १२१ मंडळांमध्ये आजवर फक्त पावसाची हजेरी लागली आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील बहुतांश सर्व मंडळांमध्ये १०० टक्क्यांच्या आसपास पाऊ स झाला आहे.औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. ७ जूनपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची तारीख असते. १२ जूनपर्यंत मराठवाड्यातील ५० टक्के भागात पावसाने हजेरी लावली आहे.गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. परिणामी मराठवाड्यातील ५० टक्के भागाला १ हजारहून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. १६ लाखांपर्यंतची लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. जून अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास टँकरची संख्या १ हजारांच्या आसपास कायम राहण्याची महसूल विभागाने वर्तविली आहे.७ जूननंतर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या उन्हाळ्यातही पुरेसा पाऊस झाला नाही. यंदाही पावसाची सुरुवात हलक्या रूपाने झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. औरंगाबादमधील ११ मंडळांत १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालन्यातील २४, परभणीतील ३९, हिंगोलीतील २८, नांदेडमधील ७४, बीडमधील ३३, लातूरमधील ५२, उस्मानाबादमधील ३९ मंडळांत पावसाने हजेरी लावली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा