शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्याला नुकसानभरपाईसाठी लागणार २,४०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 20:08 IST

यंदाच्या पावसाळ्यात ३० लाख हेक्टरवरील पिके गेली

औरंगाबाद : मराठवाड्याला जुलै, ऑगस्ट व त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टर, याच काळात सततच्या पावसाने ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टरचे आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे ७२ हजार ४९१ हेक्टरचे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १७ लाख ७० हजार ७४८ हेक्टर मिळून यंदाच्या पावसाळ्यात ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतील नुकसानभरपाईसाठी सुमारे २,४०० कोटी रुपये लागणार आहेत.

यंदा मराठवाड्यात ४८ हजार २२ हजार ७९० हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यातील ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. मागील तीन वर्षांपासून खरीप हंगाम मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या हातून जातो आहे. यंदाही तशीच परिस्थिती ओढवली आहे.जुलै-ऑगस्ट महिन्यांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी दिले. त्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ५९९ कोटी, तर गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७२ कोटी रुपयांची मदत शासनाने केली आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी २,४०० कोटींची मागणी विभागीय प्रशासनाने केली आहे.

किती शेतकऱ्यांचे नुकसानमराठवाड्यात चार महिन्यांतील पावसामुळे २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांत १७ लाख ३५ हजार ८२८ कोरडवाहू शेतीचे नुकसान झाले. ८ हजार ४७१ बागायती आणि २६ हजार ४४९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले.

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के नुकसानऔरंगाबाद : ६८ टक्केजालना : ६३ टक्केपरभणी : ४३ टक्केहिंगोली : ६४ टक्केनांदेड : ७३ टक्केबीड : ६४ टक्केलातूर : ५५ टक्केउस्मानाबाद : ६७ टक्केएकूण : ६३ टक्के

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेती