शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:33 IST

रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने औरंगपुरा व टाऊन सेंटर भागात पाणी साचले होते.

ठळक मुद्देआला रे आला : खडकेश्वर, बेगमपुºयात झाडे उन्मळून पडली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने औरंगपुरा व टाऊन सेंटर भागात पाणी साचले होते. खडकेश्वर येथे वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही, तर गारखेडा, उल्कानगरीत वीजपुरवठा खंडित झाला होता. शहराचे तापमान कमाल ३९.६ व किमान २५ मिमी इतके नोंदवले गेले.शहरात दुपारपर्यंत कडक ऊन पडले होते. घराबाहेर पडलेल्यांना उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. दुपारनंतर हळूहळू आकाशात ढगांची गर्दी झाली आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अनेक भागांत जोरदार पावसास सुरुवात झाली. असह्य झालेल्या उकाड्यापासून सुटका झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या पावसामुळे औरंगपुरा, टाऊन सेंटर व शहरातील काही सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. या पावसाचा बच्चेकंपनीने मनसोक्त आनंद लुटला. खडकेश्वर मंदिर परिसरात वृक्ष उन्मळून पडले. यात जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी सांगितले. या पावसाने उल्कानगरी, गारखेडा व परिसरात जवळपास ३ तास वीजपुरवठा खंडित होता.सखल भागात पाणीशुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने अनेक भागांत व रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते, तर काही नागरिकांनी पावसाचे पाणी साठविण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्ह्याची ६७५ मि.मी इतकी पर्जन्यमान सरासरी आहे. १ जून रोजी ४.३४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद होणे अपेक्षित होते; परंतु तेवढा पाऊस झाला नाही. आजवरच्या सरासरीनुसार १२.८९ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.पैठणमध्ये ४ जण गंभीर; कन्नडमध्ये ४ गायींचा मृत्यूपैठण तालुक्यात होनोबाची वाडी येथे जवळपास सर्वच घरांवरील पत्रे उडाल्याची घटना घडली. यामुळे ४ जण गंभीर जखमी झाले, तर कन्नड येथील बसस्थानक परिसरात ४ गायींचा ंिभंतीखाली दबून मृत्यू झाला, तर फुलंब्री शहरात १५ मिनिटे गारांचा पाऊस झाला. पावसासह जोरदार वाºयामुळे वृक्ष उन्मळून पडले, तर काही विद्युत खांबही कोसळले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादelectricityवीज