सोयगाव (जि. औरंगाबाद) : दुष्काळी परिस्थिती, त्यात वाढत्या कामांच्या व्यापामुळे शुक्रवारी दुपारी येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून दत्तात्रय समिंद्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तहसील कार्यालयात खळबळ उडाली. त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटना लक्षात आल्यावर कर्मचाºयांनी त्यांना पहिले सोयगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबादला रवाना करण्यात आले. तालुक्यात दुष्काळाच्या झळा गंभीर झाल्याने तहसील कार्यालयाचे काम वाढले आहे. यासाठी सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवण्यात येऊन दुष्काळाशी निगडित असलेल्या महसूल कर्मचाºयांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळेच ही घटना घडल्याचे कर्मचा-यांनी सांगितले.
कामाच्या ताणाने सोयगाव तहसील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 20:10 IST