शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांनी फोडले बांधकाम खात्यावर खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 02:29 IST

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, भंडारा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत बदल करण्यात आला आहे.

औरंगाबाद : राज्यभरात प्रत्येक रुग्णालयाचे १०० टक्के इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि  फायर ऑडिट केले जाणार आहे. परंतु, साधी भिंत पडली किंवा विद्युतीकरणाचे काम असेल तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र द्यावे लागते. आम्ही आरोग्य सेवेचे काम करतो. स्ट्रक्चरल ऑडिट आमचा विषय नाही, पण  आम्ही ते करवून घेणार आहोत. उपचारात कमी पडलो नाही, तर विद्युतीकरणाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडली असावी, असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भंडारा येथील दुर्घटनेचे खापर एकप्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडले.  

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, भंडारा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत बदल करण्यात आला आहे. नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यात राज्याचे अग्निशमन संचालक, आरोग्य संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचा समावेश आहे. या चौकशीचा  अहवाल तीन दिवसात येईल. नवजात शिशू विभागातील कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगांना कसे सामोरे गेले पाहिजे, यासंदर्भात प्रशिक्षणाची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यात १५ टक्के इमारती आरोग्याच्या

राज्यातील एकूण इमारतींपैकी  १५ टक्के इमारती आरोग्याच्या आहेत. त्यामुळे इमारतींप्रमाणे पैसे मिळाले पाहिजेत. निधी वेळेत मिळाला नाही तर देखभाल-दुरुस्ती वेळेत होत नाही, असे राजेश टोपे म्हणाले.ऑडिट करण्यासंदर्भात डिसेंबर महिन्यातच पत्र राज्यभरातील रुग्णालयांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट केले जाणार आहे. हे ऑडिट करण्यासंदर्भात डिसेंबर महिन्यातच पत्र काढण्यात आले आहे. आता त्यावर सुपरव्हिजन करण्याचे काम आरोग्य आयुक्त करतील. रुग्णालयात देखभाल-दुरुस्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना पत्र देतात. त्यावेळी निधीच्या उपलब्धतेप्रमाणे काम करून दिले जाते, असे टोपे म्हणाले.

टॅग्स :fireआगRajesh Topeराजेश टोपेBhandara Fireभंडारा आग