शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

आता आरोग्य केंद्रांना मिळणार ‘आॅक्सिजन’

By admin | Updated: September 28, 2016 00:46 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्ण सेवा अत्याधुनिक करण्यावर आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी भर दिला आहे. जि.प.च्या सर्व ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्ण सेवा अत्याधुनिक करण्यावर आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी भर दिला आहे. जि.प.च्या सर्व ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लवकरच आॅक्सिजन सप्लिमेंटरी यंत्रणा बसविली जाणार आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना शहरातील महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ येणार नाही.यासंदर्भात आरोग्य सभापती विनोद तांबे व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आॅक्सिजन सप्लिमेंटरी यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय आरोग्य विषय समितीमध्ये घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाला शासनाकडून यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी निधी मिळाला होता. यातील शिल्लक निधीतून जवळपास २० ते २५ लाख रुपये हे हवेपासून शुद्ध आॅक्सिजन तयार करणारे यंत्र, सिलिडंर, पाईपलाईन खरेदी करणे व ते आरोग्य केंद्रात बसविण्यासाठी खर्च केले जातील. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत या उपक्रमास मान्यता घेतल्यानंतर तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडे पाठविला जाईल. जिल्ह्यात साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला यश आले असले, तरी सध्या ग्रामीण भागात डेंग्यू, चिकुन गुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. एखाद्या गावात अशा प्रकारची लागण झाली असल्यास तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत तात्काळ डॉक्टरांचे शीघ्र कृतिदल तिकडे रवाना करण्यात येते. आपेगाव, पारुंडी, जरंडी, नागद येथे काही नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या गावांमध्ये तात्काळ डॉक्टरांचे शीघ्र कृतिदल रवाना करून रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. गावात धूर फवारणी करण्यात आली. कोरडा दिवस पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. सध्या डेंग्यूविषयी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; पण नागरिकांनी खाजगी पॅथालॉजी लॅबमध्ये यासंबंधीची तपासणी न करता शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत यासंबंधीची तपासणी करावी. खाजगी लॅबची तपासणी महागडी आहे. गरीब रुग्णांना ती परवडणारी नाही. खाजगी लॅबमधील तपासणी शुल्काबाबत कसलीही एकवाक्यता नाही. तपासणी शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे विनंती करणार आहोत, असे आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी सांगितले.