शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रेयसीचा मृतदेह कन्नडच्या घाटात देणार होते फेकून; टॅक्सी चालकामुळे प्लॅन झाला चौपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 18:48 IST

तिसऱ्या आरोपीला सिडको पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : विवाहित प्रेयसी अंकिता श्रीवास्तव हिचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह कन्नड येथील घाटात फेकून देण्याचा निर्णय प्रियकर सौरभ लाखे याने घेतला होता. मात्र, मृतदेह गाडीत टाकल्यानंतर टॅक्सी चालकाने घेऊन जाण्यास नकार दिल्यामुळे त्याचा सगळा प्लॅनच चौपट झाला. अंकिताला शिऊरला घेऊन जाण्यापासून परत आणणे, खून करणे आणि मृतदेह घेऊन जाण्यापर्यंत सौरभला साथ दिलेला आरोपी मन्वर उस्मान शहा यास उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी बेड्या ठोकल्या.

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील अंकिता श्रीवास्तवचा प्रियकर सौरभ लाखे, त्याचा मित्र मन्वर शहाने १५ ऑगस्ट रोजी सकाळीच गळा आवळून खून केला. यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी दोघे जण टॅक्सी घेऊन आले. टॅक्सी चालकाला थाप मारून मृतदेह गाडीत टाकला. काही अंतरावर गेल्यानंतर टॅक्सी चालकाला संशय आल्यामुळे त्याने कन्नडला मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनी पुन्हा मृतदेह खोलीत आणून टाकला. 

त्यानंतर दोघे शिऊरला परतले. तेव्हा सौरभने मन्वरला मांस कापण्याची सुरी मागितली. ती देतानाच त्याने यापुढे सोबत येणार नसल्याचे सौरभला सांगितले. यानंतर मन्वर गाडी घेऊन गुजरातला गेला. तेथून परत येताना राज्यातील दैनिके वाचल्यानंतर आपल्याला आरोपी केल्याचे समजल्यामुळे त्याने धुळे येथेच गाडी ठेवून बसने तो शिऊरकडे निघाला. सिडकोच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक अवचार, हवालदार लालखॉ पठाण, शेवाळे यांचे पथक त्याच्या मागावर होते. पानगावजवळ बस येताच थांबवून मन्वरला पकडले. ठाण्यात आल्यानंतर त्याने घटनाक्रमाची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर करीत होते.

आणखी दोघांसोबत अनैतिक संबंध?मृत अंकिताचे आणखी दोघांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सौरभला होता. दोन मुलांसोबतचे फोटो पाहिल्यापासून सौरभ संतप्त होता. मन्वर याने १४ ऑगस्ट रोजी तिला औरंगाबादेतून पत्नीचा बुरखा घालून शिऊरला आणत सौरभच्या गोदामात सोडले. त्यानंतर १५ ऑगस्टच्या पहाटे तोच सौरभसह अंकिताला घेऊन औरंगाबादेत आला. अंकिताचा स्वातंत्र्यदिनीच विवाहाचा आग्रह होता. खोलीवर परतल्यानंतर ती आंघोळीला गेली तेव्हाच सौरभसह मन्वरने बाहेर आल्यानंतर तिला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी पोलीस चौकशीत दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी