शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधन शोधू म्हणाला, पण मनात निराळेच; मित्राला आधी विष दिले, डोके ठेचले मग दरीत फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:34 IST

सिंदीबनच्या बेपत्ता तरुणाचा पाचव्या दिवशी आडगाव बुद्रूक शिवारात मृतदेह आढळला

छत्रपती संभाजीनगर : गुप्तधन शोधण्याचे कारण करून संतोष सुरेश खिल्लारे (३४) यांना मित्र मोहन साळवे (४४, रा. मुकुंदवाडी) याने ५ नोव्हेंबर रोजी घनदाट जंगलात नेले. त्यानंतर पहिले दारूतून विष पाजून, दगडाने डोके ठेचून हत्या केली. रविवारी सकाळी आडगाव बुद्रक शिवारात मृतदेह सापडल्यानंतर ही हत्या उघडकीस आली.

सिंदीबनमध्ये पत्नी, तीन मुले, भावासह राहणारे संतोष खासगी कंपनीत वेल्डर होते. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य व मोहन गट्टू तयार करणाऱ्या कंपनीत सोबत कामाला आहेत. त्यामुळे त्यांच्यात चांगली ओळख होती. मात्र, संतोषचा वैयक्तिक वादातून मोहन वर संशय होता. संतोष यांनी मोहनला एकदा जिवे मारण्याची धमकी दिली होती. संतोष आपल्याला मारेल, त्यापूर्वी त्याची हत्या करण्याचा कट मोहनने आखला होता. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपल्याला गुप्तधन शोधण्यासाठी जायचे असल्याचे कारण करून त्याने संतोष यांना आडगाव बुद्रुक शिवारात नेऊन दारू पाजली. त्यानंतर दगडाने डोके ठेचून हत्या केली.

अपहरणाच्या तपासात हत्या निष्पन्नकुटुंबाने ६ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात संतोषच्या बेपत्ताची तक्रार दिली. ८ नोव्हेंबरपर्यंत कुठलेच धागेदोरे हाती न लागल्याने निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सहायक निरीक्षक भरत पाचोळे यांनी तपासाच्या सूचना केल्या. त्यानंतर सहायक निरीक्षक भरत पाचोळे, अंमलदार संजय नंद, संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे, संताेष गायकवाड यांनी शोध सुरू केला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोहन संतोषला दुचाकीवरून नेताना कैद झाले. त्यानंतर पथकाने मोहनला शनिवारी रात्री घरातून ताब्यात घेतले.

विष पाजले, डोके ठेचले मग ढकलून दिलेपोलिसी खाक्या दाखवताच मोहनने हत्येची कबुली देत घटनाक्रमाचा उलगडा केला. पहिले दारूच्या तीन बाटल्या विकत घेऊन जंगलात नेले. घटनास्थळी पोलिसांना रिकामी विषाची बाटली आढळली. त्यामुळे दारूतून पहिले विष पाजले, नंतर दगडाने डोके ठेचून मारले. मृत्यू झाला नसावा, या संशयातून संतोषला दरीत ढकलून दिले. रविवारी सकाळीच निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा संतोष यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दरीत झाडाला लटकलेला आढळला. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह काढून घाटीत नेण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर