शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

उधारी वसुलीसाठी त्याने चक्क आइस्क्रीमचा ट्रक पळवला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:40 IST

ग्लो साईन बोर्डची आॅर्डर देणाऱ्या आइस्क्रीम कंपनीकडील उधारी वसूल करण्यासाठी चक्क कंपनीची ९१ हजार रुपये किमतीची आइस्क्रीम वाहनचालकाचा विश्वासघात करून उतरून घेणाऱ्या आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : ग्लो साईन बोर्डची आॅर्डर देणाऱ्या आइस्क्रीम कंपनीकडील उधारी वसूल करण्यासाठी चक्क कंपनीची ९१ हजार रुपये किमतीची आइस्क्रीम वाहनचालकाचा विश्वासघात करून उतरून घेणाऱ्या आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. आरोपीने लांबविलेल्या आइस्क्रीमचा साठाही पोलिसांनी जप्त केला. 

शेख सर्फराज असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबईतील एका आइस्क्रीम कंपनीने अहमदनगर आणि औरंगाबाद शहरातील काही दुकानदारांच्या मागणीप्रमाणे दीड लाख रुपये किमतीचे आइस्क्रीमचे १८७ कॅरेट एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कोल्ड फ्रीज वाहनातून पाठविली होती.

या वाहनाचा चालक रोहित यादव (रा. भिवंडी, ठाणे) याने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एका दुकानदाराला ३३ कॅरेट दिले. उर्वरित मालासह तो २२ एप्रिल रोजी औरंगाबादेत आला. त्यावेळी आरोपीने यादव यांना फोन करून तू आणलेल्या मालाची आॅर्डर मीच दिली आहे, असे म्हणाला. त्यानंतर तो जालना रोडवरील शासकीय दूध डेअरीसमोर येऊन यादवला भेटला. आरोपी आइस्क्रीमच्या वाहनात बसला आणि तेथून तो यादवला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथील एका खोलीत त्याला झोपण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी सर्फराज आणि त्याच्या मित्राने यादवच्या टेम्पोतील सुमारे ९१ हजार रुपयांची आइस्क्रीम चिकलठाणा येथील जुन्या वळण रस्त्यावरील आइस्क्रीम कंपनीत उतरविली आणि रिकामा टेम्पो परत आणून दिला. त्यातील मालाविषयी यादवने विचारले असता आइस्क्रीम कंपनीकडून आपली ६० ते ७० हजारांची येणी आहे. तीही रक्कम वसूल करण्यासाठी आपण हा माल उतरविल्याचे म्हणाला. ही बाब यादवने त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला फोन करून कळविली. त्यानंतर कंपनीच्या आदेशानुसार यादवने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदविली.

जीपीएसची झाली मदत ट्रान्सपोर्ट कंपनीने त्यांच्या टेम्पोला जीपीएस यंत्रणा बसविलेली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर आरोपीने टेम्पो कोणत्या मार्गाने नेला आणि कोठून परत आणला, याबाबतचा सर्व मार्ग जीपीएसमुळे मिळाला. जीपीएसचा लाभ पोलिसांना झाला.

टॅग्स :theftचोरीMONEYपैसाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसkranti chowkक्रांती चौक