शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

दर १७ दिवसाला काढावी लागतेय एकीची गर्भपिशवी; गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते

By संतोष हिरेमठ | Updated: June 5, 2023 11:44 IST

लठ्ठपणा, लवकर मासिक पाळी येणे ठरतेय धोकादायक

छत्रपती संभाजीनगर : एका नव्या जिवाला जन्म देणाऱ्या महिलांच्या गर्भाशयाचे आरोग्य कॅन्सरमुळे दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात गेल्या ७ वर्षांत गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे १४३ महिलांच्या गर्भपिशवी काढाव्या लागल्या. म्हणजे जवळपास १७ दिवसाला एकीची गर्भपिशवी काढावी लागत असून, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

इंटरनॅशनल गायनॅकालाॅजिक कॅन्सर सोसायटीने जागतिक पातळीवर जून महिना हा ‘गर्भाशय कॅन्सर जागरूकता महिना’ म्हणून घोषित केला आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी जनजागृती वाढावी, या कर्कराेगाच्या रुग्णांना उपचाराची सेवा मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे. जागतिक स्तरावर स्त्रियांमध्ये आढळणारा हा कर्करोग सहाव्या क्रमांकावर आहे. भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट, मुख आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण हे प्रामुख्याने जास्त आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयात अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीकर्करोग विभागप्रमुख डाॅ. अर्चना राठोड, डाॅ. भक्ती कल्याणकर आदी गर्भाशयाच्या कर्करोगानेग्रस्त महिलांच्या उपचारासाठी प्रयत्न करतात.

या महिलांना सर्वाधिक धोका- स्थूलता असणे- आनुवंशिकता.- वयाच्या १२ व्या वर्षाआधीच मासिक पाळीला सुरुवात झाली असेल तर.- उशिरा रजोनिवृत्ती.- ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे.

लक्षणे..- रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून रक्तस्राव होणे.- दोन मासिक पाळीत अनियमित रक्तस्राव होणे.- मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणे.- ओटीपोटीत दुखणे.

असा करा प्रतिबंध- वजन नियंत्रित ठेवणे- नियमित व्यायाम- आहारात ॲनिमल फॅटचे प्रमाण कमी ठेवणे.- कौटुंबात कुणाला कर्करोगाचा इतिहास असेल तर वयाच्या ३५ वर्षांनंतर दरवर्षी चाळणी परीक्षण करून घेणे.- लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे.

शासकीय कर्करोग रुग्णालयातील स्थितीवर्ष- नवीन रुग्ण- जुने रुग्ण- गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया२०१६- २३-५८-१३२०१७-२६-६०-२४२०१८-२३-६९-३५२०१९-६३-११२-१२२०२०-२४-१०५-४२०२१-४५-१६०-१४२०२२-४७-१३१-४१

लक्षणांकडे दुर्लक्ष नकोगर्भाशयाच्या कर्करोगाच्या महिलांमध्ये लक्षणे आढळतात. त्यामुळे वेळीच आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये निदान करून घेणे शक्य होते. त्यामुळे महिलांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. शासकीय कर्करोग रुग्णालयात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, किरणोपचार, हार्मोन थेरपी उपलब्ध आहे.- डाॅ. अर्चना राठोड, स्त्री कर्करोग विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.

टॅग्स :cancerकर्करोगAurangabadऔरंगाबादHealthआरोग्यwomens healthस्त्रियांचे आरोग्य