शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या सत्यप्रती घेण्यासाठीची गर्दी हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:44 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी बारावीचा निकाल तब्बल सहा वर्षांतील सर्वांत कमी लागला. याच वेळी विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे मंडळात पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी निकालानंतर नवव्या दिवशीही दिसून आली.

ठळक मुद्देनिकाल कमी लागल्याचा परिणाम : दोन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी बारावीचा निकाल तब्बल सहा वर्षांतील सर्वांत कमी लागला. याच वेळी विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे मंडळात पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी निकालानंतर नवव्या दिवशीही दिसून आली.औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील बारावीच्या निकालाची टक्केवारी ८७.२९ एवढी होती. २०१४ पासून सर्वांत नीचांकी निकालाची नोंद यावर्षी झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची झेरॉक्स घेऊन पाहणी करण्याकडे कल अधिक वाढला आहे. ४ जूनपर्यंत २ हजार ३९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका झेरॉक्ससाठी अर्ज दाखल केले आहेत. यात एका विद्यार्थ्याने तीन विषयाच्या उत्तरपत्रिकांची मागणी केली आहे. यासाठी प्रतिउत्तरपत्रिका ४०० रुपये याप्रमाणे १२०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या उत्तरपत्रिका देण्यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात येत आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दहा दिवसांनी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मिळणार असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय थेट उत्तरपत्रिका न पाहता पुनर्मूल्यांकन करण्यासाठी २०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून प्रतिविषयासाठी ३०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहेत. यासाठी मंडळामध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे चित्र गुरुवारी (दि.६) पाहायला मिळाले.पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणारबारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी परीक्षा मंडळ जुलैमध्येच पुरवणी परीक्षा घेणार आहे. पुरवणी परीक्षा सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात घेण्यात येत होती. ती यावर्षी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणexamपरीक्षा