शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

बँकांमध्ये रेटारेटी कायम, नोटांची टंचाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 12:37 AM

जालना : शहरासोबतच संपूर्ण जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटांसाठी रेटारेटी कायम आहे

जालना : शहरासोबतच संपूर्ण जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटांसाठी रेटारेटी कायम आहे. रांगा लावूनही नोटा मिळतीलच याची शाश्वती नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील सर्वच बँकांमध्ये पुरशा नोटा नसल्याने नागरिकांना दोन ते तीन हजार रूपयांच्या रकमेवरच समाधान मानावे लागत आहे. बुधवारी बँकांमध्ये नोटा जमा करून नवीन नोटा घेणाऱ्यांच्या बोटावर शाई लावण्यात येत आहे. यामुळे एक व्यक्ती पुन्हा येऊ नये असे त्या मागचे कारण असल्याचे बँक अधिकारी सांगत आहेत. जुन्या नोटांच्या तुलनेत नवीन नोटांची कमतरता आहे. काही बँकांमध्ये दोन हजारासंसोबतच पाचशेऐवजी शंभर नोटा दिल्या जात आहे. पाचशे रूपयांच्या नोटांची उपलब्धता कमी असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जुना जालना भागातील बँक आॅफ महाराष्ट्र ,हैदराबाद बँकांसमोर दुपारी चार वाजेपर्यंत मोठी गर्दी होती. मात्र बँकांमध्ये नोटांची टंचाई असल्याने अनेकांना जुन्या नोटाच जमा कराव्या लागल्या. नवीन नोटा मिळू शकल्या नाहीत.नवीन जालना भागातील बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी, सेंट्रल बँक, स्टेट बँक इ. विविध बँकांसमोर नागरिकांच्या रांगा कायम होत्या. (प्रतिनिधी)