शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा किलो सोने चोरणारे अटकेत; बुलडाण्यातून घेतले दोन आरोपींना ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:09 IST

टोळीतील दोन जणांना बुलडाणा येथून गुन्हे शाखा पोलिसांनी पकडून आणले.

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची पोलिसांना मदत झाली.दागिने विकणार होते

औरंगाबाद : समर्थनगरातील रहिवासी बँक कर्मचारी महिलेचे घर फोडून पन्नास तोळ्याचे दागिने आणि लाखाची रोकड चोरून नेणाऱ्या टोळीतील दोन जणांना बुलडाणा येथून गुन्हे शाखा पोलिसांनी पकडून आणले. या दोन संशयितांना न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

किरण सोपान चव्हाण (१९) आणि कर्मा प्रकाश पवार (२०, दोघे रा. बाराई, ता. मेहकर, जि. बुलडाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, समर्थनगर येथील व्यंकटेश अपार्टमेंटमधील रहिवासी सुनीता धर्मंेद्र पुराणिक  यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ४ फेब्रुवारी रोजी भरदिवसा पन्नास तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख चोरून नेले होते.

याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची पोलिसांना मदत झाली. तेव्हा ही चोरी बुलडाणा जिल्ह्यातील पाच ते सहा जणांच्या टोळीने केल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या समोर आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि कर्मचाऱ्यांचे पथक  बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गेले होते. तेथे शोध घेऊन पोलिसांनी संशयित आरोपी किरण चव्हाण आणि कर्मा पवार यांना ताब्यात घेऊन औरंगाबादेत आणले. 

दोन्ही आरोपींना शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख यांनी  न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध घेणे आहे. त्यांनी चोरून नेलेले पन्नास तोळ्याचे दागिने आणि रोख एक लाख रुपये जप्त करणे आहे. त्यांनी गुन्हा करण्यापूर्वी पुराणिक यांच्या घराची स्थानिक व्यक्तीच्या मदतीने रेकी केली आहे. यामुळे त्यांना या गुन्ह्यात मदत करणाऱ्यास अटक करणे आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यासाठी दोन्ही आरोपींना दहा दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद मान्य करून आरोपींना १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दागिने विकणार होतेचौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली देऊन अन्य साथीदारांच्या मदतीने ४ फेब्रुवारी रोजी ही चोरी केल्याचे सांगितले. लुटलेला माल त्यांनी आपसात वाटून घेतला होता. या मालाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पसार आरोपींनी घेतली. त्यांनी चोरून नेलेले सोन्याचे मणीमंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, कानातील रिंग, टॉप्स, अंगठ्या, सोन्याची नाणी, असा सुमारे अर्धा किलोच्या ऐवजासह पसार झाले होते. दागिने विक्री करून येणारी रक्कम आपसात वाटून घेणार असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस