शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आपतगावचा अर्धवट पाडलेला जलकुंभ बनला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 19:46 IST

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

एकेकाळी गावाला पाणी पुरवठा करणारा हा अर्धवट पाडण्यात आला. दोन वर्षांपासून याची स्थितीत हा जलकुंभ आहे. जलकुंभ राज्य रास्ता २११ मध्ये येतो. त्यामुळे येथुन पाणी पुरवठा बंद केला आहे. यासाठी पर्यायी जलकुंभ उभारण्यात आला. यातून दोन वर्षांपासून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. परतु याच रस्त्याचे काम करताना भारत निर्माण योजनेंतर्गत टाकण्यात आलेली पाईप लाईन जागो जागी फुटली. या पाईपलाईनमधून जागोजागी गळती आहे.संबंधित कंत्राटदार कंपनीने ही गळती अद्याप थांबविली नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला समान पाणी पुरवठा होत नसल्याचे भगवान पाटील चौधरी यांनी सांगितले.

या रस्त्याचे काम आयआरबी कंपनी करत आहे. हा जलकुंभ पाडण्यासाठी दोन दिवसांपासून मातीचा ढिगार तयार केला. बुलोडजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धवट स्थितीत ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गावात जाण्यासाठी हा जलकुंभ अडथळा ठरत आहे. पर्याय म्हणून पुलाखालून जाण्यासाठी रस्ता आहे. परतु वळसा घालून जावे लागते. शिवाय बाजूलाच मैदान आहे. सकाळी व संध्याकाळी येथे मुले व्हॉली बॉल खेळण्यासाठी येतात.

यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या रास्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे टाकी जमीनदोस्त होऊ शकलेली नाही. उद्या एखादी दुर्घटना घडली तर कंपनीवे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोसले पाटील दिला आहे. पर्याय म्हणून दुसरी पाण्याची टाकी वेळेत बांधली. तसेच भारत निर्माण योजनेंर्तगत केलेली पाईपलाईन या रस्त्याच्या कामात तुटली. याची दुरुस्ती अद्याप करुन देण्यात आलेली नाही. ती तात्त्काळ जोडून देण्याची मागणी भगवान चौधरी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद