शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

औरंगाबादमध्ये २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त; वाहतूक कंपनीविरुद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 15:02 IST

जुन्या मोंढ्यातील बॅटको ट्रान्स्पोर्ट येथे परराज्यातून गुटखा आणल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली.

ठळक मुद्देगोदामात पांढऱ्या गोण्यात आणि  गोणपाटात लपवून ठेवलेला गुटखा आढळला. शहरात गुटखा माफिया सक्रिय असून, ते बिनधास्तपणे गुटखा विक्री करतात.

औरंगाबाद : शहरातील दुकानदारांना पुरवठा करण्यासाठी परराज्यातून आणलेला सुमारे २५ लाख ६० हजार ५४० रुपयांचा गुटखा गुन्हे शाखेने गुरुवारी दुपारी बॅटको ट्रान्स्पोर्टमधून जप्त केला. ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मॅनेजरसह अन्य एकाविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ट्रान्स्पोर्टचा मॅनेजर हनीफ अब्दुल रहेमान पटणी (४३, रा. टाइम्स कॉलनी) आणि नदीम शेख, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी हनीफ यास अटक केली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुन्या मोंढ्यातील बॅटको ट्रान्स्पोर्ट येथे परराज्यातून गुटखा आणल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. त्यावरून सहायक पोलीस  आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, कर्मचारी शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, राजेंद्र साळुंके, विरेश बने, विठ्ठल सुरे आणि भावसिंग चव्हाण त्यांच्या पथकाने  अन्न भेसळ विभागाचे  अधिकारी एम.एम. फाळके, एच.व्ही. कुलकर्णी आणि श्रीराम  टापरे यांना सोबत घेऊन गुरुवारी दुपारी बॅटको ट्रान्स्पोर्टवर धाड  टाकली.  

गोदामात पांढऱ्या गोण्यात आणि  गोणपाटात लपवून ठेवलेला सुमारे २४ लाख ६० हजार ५४० रुपयांचा गुटखा आढळला. हनीफकडे या मालाविषयी विचारणा केली असता गुरुवारी सकाळी इंदूर येथून नदीम शेख यांच्या मालकीचा सुमारे ९ लाखांचा माल आल्याचे त्याने सांगितले. उर्वरित गुटखा कोणाचा, कोणी मागवला,  कुठून आणला याविषयी कोणतीही कागदपत्रे सादर करण्यास त्याने असमर्थता दर्शविली. ट्रान्स्पोर्टने आलेल्या मालाची कागदपत्रे (बिल्टी) ठेवण्याची जबाबदारी त्याची आहे. मात्र, त्याने माहिती देण्यास नकार दिला. आरोपीविरूध्द जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहरात सहज व सर्वत्र मिळतो गुटखा शहरात गुटखा माफिया सक्रिय असून, ते बिनधास्तपणे गुटखा विक्री करतात. शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि चौकातील टपरीवर गुटखा खुलेपणाने विक्री केला जातो. ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्येही हे स्पष्ट झाले होते. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद