शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत गुन्हेशाखेने जप्त केला साडेतीन लाखाचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:55 IST

गुन्हेशाखा आणि सिटीचौक पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केले आहे

औरंगाबाद: गुटखा आणि घातक रसायन मिश्रीत सुंगधी तंबाखू विक्री करण्यास राज्य सरकारने बंदी घातलेली असतांना शहरात चोरट्या मार्गाने सहज गुटखा मिळतो. ही बाब गांभीर्याने घेत गुन्हेशाखा आणि सिटीचौक पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केले.  आठ दिवसात सलग तिसरी कारवाई करीत, गुन्हेशाखेने सातारा परिसरातील अलोकनगरातील एका घरात लपविला ३ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. हा साठा करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी अटक केली. 

शिवहर गोपाळराव माळशिखरे (वय ३८,रा. गणेशनगर, पुंडलिकनगर) असे अटक  आरोपीचे नाव आहे. गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, गुन्हेशाखेचे पथक गस्तीवर असताना अलोकनगरात बांधकाम सुरू असलेल्या एका घरात गुटख्याचा साठा एकाने आणून ठेवला असून तेथून या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. निरीक्षक मधूकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि पथकाने ,अन्न सुरक्षा अधिकारी यांना सोबत घेऊन १९ मे रोजी सकाळी संशयित घरावर  धाड टाकली.

तेथे आरोपी शिवहर गोपाळराव माळशिखरे बसलेला होता. त्या घरात सुमारे २ लाख ३७ हजार रुपये किंमतीच्या हिरा पान मसाल्याच्या १५ गोण्या आणि  १ लाख २८ हजार रुपये किंमतीच्या रॉयल ७१७ ही सुगंधी तंबाखूच्या नऊ गोण्या असा सुमारे ३ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा मिळाला. आरोपीविरूद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, पोलीस कर्मचारी सुधाकर मिसाळ, अफसर शहा, विकास माताडे, लालखॉ पठाण, बापूराव बावस्कर, धर्मराज गायकवाड, संजय राजपूत, योगेश गुप्ता, नंदू चव्हाण आणि शिवाजी शिंदे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादraidधाड