शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘गुम है किसी के प्यार में...’; ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त 'युनिक गिफ्ट' देण्याकडे प्रेमीजणांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 18:36 IST

सध्या 'व्हॅलेंटाइन वीक' सुरू आहे. यानिमित्ताने बाजारातील दुकाने सजली आहेत.

- पूजा येवला/ आर्या राऊतछत्रपती संभाजीनगर : ‘गुम है किसी के प्यार में, ये दिल सुबह शाम...’ असे प्रेमळ सूर छेडत अनेक प्रेमीजण, युगुल आपल्या स्नेहांकितांसाठी काय भेटवस्तू घ्यावी, या विचारात बाजारात फिरताना दिसत होते. लाल गुलाबांसह, लाल रंगाची वस्त्रप्रावरणे, टेडिबीअर्स नव्हे, तर भेटवस्तूंनाही आकर्षक लाल पॅकिंग दिसत असून, सजलेल्या बाजारात सध्या लाली पसरल्याचे दिसते आहे.

सध्या 'व्हॅलेंटाइन वीक' सुरू आहे. यानिमित्ताने बाजारातील दुकाने सजली आहेत. व्हॅलेंटाइन डे निमित्त कपड्यांच्या दुकानात खासकरून लाल रंगाचे कपडे दर्शनी भागात लावले आहेत. तरुणांनी आपल्या प्रियकर प्रेयसीकरिता गिफ्ट घेण्यासाठी बाजारात गर्दी केलेली दिसून आली. यावर्षी रोझ डेला प्रेमाचं प्रतीक लाल गुलाबाचा ट्रेंड बदलत आर्टिफिशियल गुलाबाचा ट्रेंड दिसून आला. नवीन पॅकेजिंग, विविध फ्लेव्हरसह चॉकलेट आणि १०० रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंतचे टेडी खरेदी केले गेले.

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने बाजारात कस्टमाइज गिफ्टचा ट्रेंड दिसून आला. ज्यात कपल रिंग, कपल वॉच, कपल कॉफी मग, कपल शोपिस अशा गिफ्टला तरुणांकडून सर्वाधिक पसंती आहे. याव्यतिरिक्त लव मीटर, परफ्यूम, लव लेटर, हार्ट पिलो, ग्रीटिंग आदी वस्तूंचीदेखील खरेदी तरुणांनी केली आहे. रेस्टॉरंट, कॅफेमध्ये लाल रंगाचे फुगे, गुलाबाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. अनेक कॅफेमध्ये प्री बुकिंग केलेली दिसून आली.

यावर्षी कमी प्रतिसाद दरवर्षीपेक्षा तुलनेने यावर्षी फूल खरेदीस कमी प्रतिसाद होता. बाजार, उद्यानात दिसणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाणही घटले आहे. रोझ डे आणि व्हॅलेंटाइन डे हे दोन दिवस आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा अधिक विक्री होते.- अमोल शिंदे, फूल विक्रेते

उपयोगी भेटवस्तू देण्यावर अधिक भरयावर्षी तरुण सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याला पसंती देताहेत. प्रत्यक्ष भेटून हा दिवस साजरा करणाऱ्या अनेक तरुणांचा उपयोगी भेटवस्तू देण्यावर अधिक भर आहे. जसं की वॉलेट, घड्याळ, ब्रेसलेट, ईअरफोन आदी.- संगीता मालपुरे, गिफ्ट विक्रेते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे