शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गुलमंडी सर्वात महाग, मिटमिटा, पडेगाव स्वस्त; छत्रपती संभाजीनगरात चारही दिशांमध्ये घर महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:35 IST

गुलमंडी व परिसर ‘हार्ट ऑफ दी सिटी,’ तर जालना रोड, सिडको परिसर, रेल्वे स्टेशन, गजानन महाराज मंदिर, बीड बायपास, चिकलठाणा, सातारा, पैठण रोड, गोलवाडी हा परिसर प्राइम लोकेशनमध्ये असल्याचे दिसते.

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या चारही दिशांमध्ये घर, भूखंड, कार्यालय, दुकान घेणे महागले आहे. तसेच बांधकाम करणेही महागले आहे. तीन वर्षांनंतर शासनाने रेडीरेकनर दरांमध्ये १ एप्रिलपासून महापालिकेच्या हद्दीत ३.५३ टक्के वाढ केली असून, शहरातील सर्वांत महागडे परिसर गुलमंडी, निराला बाजार असल्याचे दरांच्या विवरण तक्त्यानुसार दिसते आहे. गुलमंडी व परिसर ‘हार्ट ऑफ दी सिटी,’ तर जालना रोड, सिडको परिसर, रेल्वे स्टेशन, गजानन महाराज मंदिर, बीड बायपास, चिकलठाणा, सातारा, पैठण रोड, गोलवाडी हा परिसर प्राइम लोकेशनमध्ये असल्याचे दिसते. शहर व परिसरात घर, जमीन घेण्यासाठी सामान्यांना जादा पैसे मोजावे लागतील. खुली जागा, प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, तळमजला, शेती, जिरायती, संभाव्य बिनशेती, एनए असे दरांचे वर्ग आर. आर.मध्ये आहेत.

शहरात वर्गीकरण झोननिहायमुस्तफाबाद, उस्मानपुरा, इटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बनेवाडी, शहानूरवाडी, गुलमंडी, पैठणगेट, क्रांती चौक, रेल्वे स्टेशन, उस्मानपुरा, जवाहर कॉलनी, गजानन महाराज मंदिर परिसर, बीड बायपास, हर्सूल, बुढी लेन, रोशन गेट या भागांत वेगवेगळे दर आहेत.

बांधकामांचे दरआरसीसी बांधकाम करण्यास २५ हजार ४१० रु. प्रति चौ.मी, अ वर्ग नगरपालिका हद्दीवरील वर्गानुसार २४१४०, तर ब, क वर्ग न.पा.; नगर पंचायती हद्दीत २२ हजार ८६९ रुपये आणि ग्रामीण भागातील प्रभावक्षेत्रात २०३२८ रुपये मोजावे लागतील.

बसणार खिशाला झळ१ हजार स्क्वे. फुटांचा फ्लॅट गुलमंडीत घ्यायचा असेल व फ्लॅटची किंमत जर ७० लाख रुपये गृहीत धरली तर रेडी रेकनरच्या ३.५३ टक्के दरानुसार सुमारे २ लाख रु. जादा मोजावे लागतील. त्यावर मुद्रांक नोंदणीचा खर्च वेगळा असेल. जिरायत, बागायत शेती, गावठाण हायवेलगत, भविष्यात एन-ए होणाऱ्या जमिनींसाठी वेगवेगळे दर आहेत.

३० गावे प्रभावक्षेत्राखालीबाळापूर, गांधेली, हनुमंतगाव, सहजापूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, गोलवाडी, गंगापूर नेहरी, दौलताबाद, रावरसपुरा, शेंद्रा खमंगर, सुंदरवाडी, फत्तेपूर, पिसादेवी, सावंगी, हिरापूर, झाल्टा, गेवराई, गेवराई तांडा, कुंभेफळ, लाडगाव, शेंद्राबन, वरूड काजी, गंगापूर जहाँगीर, करमाड, हिवरा, टोणगाव ही गावे प्रभावक्षेत्रात आहेत.

प्रति चौरस मीटर झोननिहाय दर

परिसर......................... जुने दर रु................. नवे दर रु.क्रांती चौक ते स्टेशन प्लॉट : ४४८००................४९२८०

फ्लॅटचे दर..........................४६०००..............५०६००जालना रोड ते सेव्हन हिल्स प्लॉट....५२०००........स्थिर

फ्लॅटचे दर .............................६५०००..........७१५००गजानन महाराज मंदिर प्लॉट ...........३०४००........३३४००

फ्लॅटचे दर ...............................३८०००..........४१८००गुलमंडी, निराला बाजार प्लॉट ........७६६००..........स्थिर

फ्लॅटचे दर ..............................८४२००........९२६२०बीड बायपास प्लॉटचे दर ..............२४०००.......२४४९०

फ्लॅटचे दर ...........................४३०००.............४७७००चिकलठाणा, जालना रोड प्लॉट ...२५९००.......२६२००

फ्लॅटचे दर ..................४००००...................४४०००मिटामिटा, पडेगाव प्लॉट ......९५००..............१०२९०

फ्लॅटचे दर ........................ ३१५८०...........३४७४०सिडको एन-१ व इतर प्लॉट दर... ४८२००..... ५०१५०

फ्लॅटचे दर ....................... ६६०००...........७००००

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका