शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या फायनान्ससरने भाजप पदाधिकाऱ्यास १८ लाखांना गंडवले

By राम शिनगारे | Updated: November 24, 2022 19:28 IST

उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

औरंगाबाद : शिक्षण संस्था खरेदीसाठी ५० कोटी रुपये कर्ज देण्याच्या अमिषाने गुजरातच्या फायनान्सरने भाजपचे जिल्हा सरचिटणीस तुषार शिसोदे यांची १७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुजरातच्या तीन जणांवर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंदविला आहे.

विकास शहा, दिपेश दिनेश चौधरी आणि नवनित सिंग (सर्व रा. भावनगर, गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत. भाजप जिल्हा सरचिटणीस तुषार शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना सातारा जिल्ह्यातील गौरी शंकर ऐज्युकेशन साेसायटी ही संस्था विकत घ्यायची होती. त्यासाठी ५० कोटी रुपये कर्जाची आवश्यकता होती. ठाण्यातील एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातुन नवनीतसिंग याची ओळख झाली. त्याने विकास शहा हा अहमदाबादेतील मोठा फायनान्सर आहे. तो ५० कोटी रुपये कर्ज देईल, असे सांगितले. त्यानुसार शिसोदे हे २ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे शहा व दिपेश चौधरी याना भेटले. तेव्हा त्यांना ५० कोटी रुपये कर्ज देण्यास दोघांनी होकार दिला. ५० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीचे १७ लाख ७५ हजार रुपये डीसी इंटरप्राईजच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर वकिलाच्या माध्यमातुन ॲग्रीमेंट केले जाईल असे सांगितले. त्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा येण्याची सूचना दिली. त्यानुसार शिसोदे व त्यांच्या ठाण्यातील मित्र ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा अहमदाबादला पोहचले. शहा याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या डीसी इंटरप्राईजच्या बँक खात्यात शिसोदे यांच्या खात्यातुन १७ लाख ७५ हजार रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर शहा हा वकिलाला घेऊन येतो अशी थाप मारून निघुन गेल्यानंतर परत आलाच नाही.

तिघांचे मोबाईल फोन बंदफिर्यादी शिसोदे यांनी बॅक खात्यातुन पैसे आरटीजीएस केल्यानंतर आरोपी शहा वकिलाला घेऊन परत येतो, असे सांगुन निघुन गेल्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिसोदे कार्यालयाच्या दारातच बसले. त्यांनी तिन्ही आरोपींना वारंवार फोन केला मात्र, त्याचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शिसोदे यांच्या लक्षात आले. या प्रकरणी निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रविण वाघ तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादGujaratगुजरात