बीड: यंदा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे. दुष्काळी स्थितीची पहाणी करण्यासाठी पालक सचिव प्रमोद नलावडे सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.गतवर्षीपेक्षाही यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १४०३ गावांपैकी १३७७ गावांची पैसेवारी पन्नास पेक्षा कमी असल्याचा अहवाल दिला आहे. दिलेल्या अहवालानुसार संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. याशिवाय बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील. यासाठी पालक सचिव प्रमोद नलावडे बीड जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर येत आहेत.(प्रतिनिधी)
पालक सचिव येणार दुष्काळी दौऱ्यावर
By admin | Updated: November 16, 2014 00:38 IST