शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारीबाबत पालकमंत्र्यांची धमकी, तर महापालिका आयुक्त राबवीत आहेत राज्यकर्त्यांचा अजेंडा - भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 11:53 IST

Subhash Desai : नियमितीकरणाच्या नावाखाली गुंठेवारी वसाहतींमधून मनपा महावसुली करत असल्याचा भाजपाचा आरोप

ठळक मुद्दे१५ नोव्हेंबरनंतर पालिकेवर नागरिकांचा मोर्चाखैरेंनी विषयपत्रिका मंजूर केली तरच निर्णय व्हायचे

औरंगाबाद : गुंठेवारी वसाहतींमध्ये नियमितीकरणाच्या नावाखाली महापालिकेने महावसुली अभियान सुरू केले असून, याविरोधात १५ नोव्हेंबरनंतर पालिकेवर नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा भाजपा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. गुंठेवारी वसाहतींना स्लम घोषित करावे, गुंठेवारीतील करांचा ५० टक्के वाटा शासनाने उचलावा, या प्रमुख मागण्या मोर्चामध्ये असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी व्हिडीओमधून नागरिकांना धमकीवजा इशारा दिला आहे, तर महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे राज्यकर्त्यांचा अजेंडा राबवीत असल्याचा आरोप करीत केणेकर म्हणाले, दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांची दैनंदिनी विस्कळीत झाली. सुमारे १२० वसाहतींमधून मजूर, कामगार, नागरिक या भागात राहतात.

महापालिकेच्या सभेमध्ये जेव्हा गुंठेवारी नियमितीकरणाचे ठराव आणले गेले, त्यावेळी भाजपाने वारंवार नागरिकांची बाजू घेतली आहे. शिवसेनेने किमान गुंठेवारीतील कायद्याचे पुन:मूल्यांकन करण्याची मागणी शासनाकडे केली पाहिजे. परंतु त्यांच्याच पक्षातील काही लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनी गुंठेवारी मालमत्ता नियमितीकरण करून दुकाने थाटली आहेत. या वसाहतींचा उदय होत असताना पालिकेने आणि शासनाने वारंवार डोळेझाक केली. त्यामुळेच या वसाहतींमध्ये असुविधा निर्माण झाल्या. आता गुंठेवारीतील व्यापारी मालमत्तांवर कारवाईस तूर्तास स्थगिती दिल्याचे पालकमंत्री सांगत असले तरी व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत. या पत्रकार परिषदेला राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, सागर पाले, मनीषा मुंडे, राजेश मेहता, शैलेश हेकाडे आदींची उपस्थिती होती.

खैरेंनी विषयपत्रिका मंजूर केली तरच निर्णय व्हायचेमाजी महापौर भगवान घडमोडे यांनी आरोप केला की, मनपा सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका आधी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे जायची. त्यांनी निर्णय घेतला तरच विषयपत्रिका मंजूर होत असे. त्यामुळे आम्ही जरी शिवसेनेसोबत सत्तेत राहिलो असलो तरी गुंठेवारीतील असुविधांचे पाप आमच्यामुळे नसून ते शिवसेनेमुळेच आहे. कारण प्रत्येक विकासाच्या ठरावाला त्यांनीच विरोध केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSubhash Desaiसुभाष देसाई