शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

लघु उद्योगांचा सव्वावर्षाचा ‘जीएसटी’ परतावा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:14 IST

‘पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह’ याअंतर्गत दरवर्षी ‘जीएसटी’चा परतावा मिळण्यासाठी लघु उद्योजक दरवर्षी शासनाकडे अर्ज करतात.

ठळक मुद्दे शासनाने कर्ज घेऊन परताव्याची तरतूद करावीउद्योजकांसाठी दरवर्षी ३० कोटी रुपयांपर्यंत हा परतावा मिळत असतो.

- विजय सरवदे  

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक लघु उद्योगांचा ‘जीएसटी’चा परतावा मंजूर झालेला आहे; पण शासनाकडे पैसे नसल्यामुळे तो मिळत नाही. शासनाने कर्ज घेऊन परताव्याची तरतूद करावी, अशी अपेक्षा ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. 

‘लोकमत’शी बोलताना मुकुंद कुलकर्णी म्हणाले की, ‘पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह’ याअंतर्गत दरवर्षी ‘जीएसटी’चा परतावा मिळण्यासाठी लघु उद्योजक दरवर्षी शासनाकडे अर्ज करतात. मराठवाड्यातील उद्योजकांसाठी दरवर्षी ३० कोटी रुपयांपर्यंत हा परतावा मिळत असतो. हा परतावा मंजूरही झालेला आहे. मात्र, अलीकडे सव्वा वर्षापासून तो रखडला आहे. शासनाची आर्थिक स्थिती खराब आहे; पण शासनाला कर्ज लवकर मिळू शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांचीही आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे शासनाने कर्ज घेऊन ‘जीएसटी’चा परतावा द्यावा, अशी अपेक्षा आहे. 

अलीकडच्या लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग संघटनांनी उद्योगाउद्योगात जाऊन अँटिजन टेस्ट राबविल्या. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. लोकांचा आत्मविश्वास वाढला. कंपनीत येणाचे प्रमाण वाढले. अजूनही पूर्वपदावर येण्यासारखी उद्योगांची परिस्थिती नाही. दिवाळीपर्यंत स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. देश, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठा शंभर टक्के उघडलेल्या नाहीत. त्यामुळे आॅर्डरचे प्रमाण सध्या ६० ते ६५ टक्के एवढे असून, तेवढ्याच उत्पादन क्षमतेने उद्योग सुरू आहेत. महिनाभरापूर्वी लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांना मिळणाऱ्या आॅर्डर अन्य शहरांकडे वळण्याची भीती होती; परंतु शंभर ते सव्वाशे कंपन्यांनी विशेष परवानगी घेऊन कामगारांची व्यवस्था कंपनीत, काहींनी जवळच्या हॉटेलमध्ये केली व उत्पादन काढले. त्यामुळे आॅर्डर दुसऱ्या शहराकडे वळण्याचा धोका टळला, असे मुकुंद कुलकर्णी म्हणाले. 

काही उत्पादनावरचा ‘जीएसटी’ कमी करावा‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले की, शासनाने ज्याप्रमाणे बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्याचा विचार केला आहे. त्याप्रमाणे उद्योगांना गती देण्यासाठी जास्त विक्री होणाऱ्या उत्पादित मालावर ‘जीएसटी’ कमी करावा. ज्यामुळे उद्योगांतील उत्पादित मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होण्यास मदत होईल. 

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायfundsनिधी