शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कमी पण किराणा दुकानदार जुन्या दरातच विकताहेत वस्तू; ग्राहक-व्यापाऱ्यात चकमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:16 IST

किराणा व्यापारी जुन्या किमतीतच वस्तू विकत होते. यामुळे काही ठिकाणी ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले.

छत्रपती संभाजीनगर : जीएसटी दर कमी झाल्याने घराच्या आसपासच्या किराणा दुकानात टूथब्रशपासून ते ब्रँडेड गावरान तुपापर्यंतच्या असंख्य वस्तू खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांच्या पदरी निराशा आली. कारण, किराणा व्यापारी जुन्या किमतीतच वस्तू विकत होते. यामुळे काही ठिकाणी ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले. मात्र वितरक, मॉल, सुपर शॉपींनी त्यांच्याकडील जुन्या वस्तूही कमी झालेल्या किमतीत विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्राहकांना किंचित समाधान मिळाले.

किराणा दुकानातील ब्रँडेड ५४ वस्तूंवरील जीएसटी ५ टक्के तर कुठे शून्य टक्के करण्यात आला. मात्र, याचा फायदा सोमवारी ग्राहकांना मिळाला नाही. ‘आम्ही जास्त दरातील जीएसटी भरून माल खरेदी केला आहे. यामुळे आम्ही त्याच किमतीत माल विकणार. नवीन उत्पादनात कंपन्या कमी एमआरपी करतील, तो माल आल्यावर आम्ही नवीन दरात विकू’, असे दुकानदार ग्राहकांना सांगत होते. तर ‘जेव्हा भाव वाढतात तेव्हा तुम्ही लगेच किमती वाढवतात, आता भाव कमी झाल्यावर किमती कमी का करत नाही’, असा सवाल ग्राहक व्यापाऱ्यांना विचारत होते. मात्र, किराणा वगळता औषधी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व वाहनांच्या किमती कमी झाल्या. काहींनी जुनी व नवीन किमतीची यादी समोर ठेवली होती. यामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीपासूनच शोरुममध्ये गर्दी दिसली.

नवीन दरातच जुन्या वस्तू विकाकिराणा साहित्यात ५४ ब्रँडेड वस्तूवरील जीएसटी कमी झाला आहे. वितरकांनी लगेच पहिल्या दिवशी कमी झालेल्या नवीन दरातच माल विक्री करणे सुरु केले. किती टक्के वस्तूंचे भाव कमी झाले, याचे फलक काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लावले. मात्र, काही दुकानदार जुन्या दरातच माल विकत आहेत. त्या व्यापाऱ्यांनी जुन्या वस्तूही नवीन कमी झालेल्या किमतीत विकाव्यात. नंतर जीएसटी रिटर्न भरताना त्यांना किमतीमधील तफावत मिळेल.- संजयकुमार कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

नवीन वस्तू नवीन दरात विक्री होतीलअनेक किराणा व्यापारी असे आहेत की, त्यांची जीएसटी प्रणालीत नोंदणी नाही. असे किराणा व्यापारीच जुन्या किमतीत जुना माल विकत आहेत. नवीन उत्पादने येतील, त्यावर नवीन किंमत असेल. तेव्हाच ग्राहकांना जीएसटी कमी झाल्याचा फायदा मिळेल.- लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :GSTजीएसटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर